रिया चक्रवर्तीने सुशांतला ड्रग्ज दिले, एनसीबीच्या चार्जशीटमध्ये आरोप; रियाच्या अडचणीत वाढ

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) केसचा तपास करणाऱ्या NCB (नार्कोटिक्स ब्यूरो) ने पहिली चार्जशीट दाखल केली आहे.

रिया चक्रवर्तीने सुशांतला ड्रग्ज दिले, एनसीबीच्या चार्जशीटमध्ये आरोप; रियाच्या अडचणीत वाढ

मुंबई : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) केसचा तपास करणाऱ्या NCB (नार्कोटिक्स ब्यूरो) ने पहिली चार्जशीट दाखल केली आहे. ज्यामध्ये रिया चक्रवर्तीच्या नावाचाही समावेश आहे. NCB च्या चार्जशीटमध्ये 32 व्यक्तींच्या विरोधात अवैध तस्करीचा आरोप लावण्यात आला आहे. एनडीपीएस अधिनियमानच्या कलम 27 अ प्रमाणे आरोप लावण्यात आला आहे. (Rhea Chakraborty in NCB chargesheet accused of giving drugs to Sushant Singh Rajput)

ज्यात आरोपींना 10 आणि जास्तीत जास्त 20 वर्षांच्या कैदीची तरतूद आहे. रियाने यापूर्वीच स्वतःच घरात ड्रग्स आणत असल्याचं मान्य केलं आहे. नोव्हेंबर 2019 पासून याची सुरुवात झाली होती. एवढंच नाही तर ड्रग्ससाठी रियानं भाऊ शौविकलाही आधीच पैसे ट्रान्सफर केले होते. ज्यामुळे आता NCB नं रियावर ड्रग्स खरेदी करण्याचे आणि ते सुशांतला पुरवण्याचे आरोप लावले आहेत.

सुशांतला मारिजुआना आणि गांजा दिला जात असे. रिया व्यतिरिक्त तिचा भाऊ शौविक, सुशांतच्या घरातील मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत आणि ऋषीकेश पवार नावाचा अन्य एक आरोप ड्रग्स खरेदी करून सुशांतला पुरवत असे असं या चार्जशीटमध्ये नमुद करण्यात आले आहे. यातील काही आरोपी हे जमिनावर बाहेर आले आहेत. तसेच या केसचा अधिक तपास अद्याप सुरू आहे.

NCB ने 11,700 पानांची चार्जशीट न्यायालयात सादर केली. यामुळे रियाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. NCB ने न्यायालयात जी चार्जशीट दाखल केली आहे त्यानुसार रियाला 10 किंवा 20 वर्षांची जेल देखील होऊ शकते. अभिनेता सुशांत सिंह राजपूत 14 जूनला त्याच्या मुंबईतील वांद्रे येथील घरी मृत आढळून आला होता.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज केसमध्ये रियाचं नाव पुढे आलं होतं. त्यानंतर तिला अटक करण्यात आलं होतं त्यानंतर ती जवळपास एक महिन्यापर्यंत तुरुंगात होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने तिची जामीन याचिका मंजूर केली. रियासोबत तिचा भाऊ शौविकलाही अटक करण्यात आली होती. शौविकला तीन महिन्यांनंतर उच्च न्यायालयाने जामीन दिली.

संबंधित बातम्या : 

Income Tax Raid | हॉटेल बदललं, मात्र अनुराग-तापसीची चौकशी सुरूच! आयकर विभागाची टीमही हजर

Sonu Sood | सोनू सूदच्या नावे तुम्हालाही आलीय का 5 लाखांच्या कर्जाची ऑफर? जाणून घ्या या मागची सत्यता…

Good News | ‘रोडीज’ फेम रणविजय सिंघाकडे पुन्हा एकदा ‘बाबा’ बनणार! सोशल मीडियावर शेअर केला ‘हा’ खास फोटो!

(Rhea Chakraborty in NCB chargesheet accused of giving drugs to Sushant Singh Rajput)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI