रिया अद्याप सुशांतच्या दुःखातून सावरली नाही, म्हणाली…

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनाच्या धक्क्यातून अजूनही त्याचे फॅन्स सावरले नाहीत. सुशांतच्या निधनानंतर त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती वादाच्या भोवऱ्यात आली होती.

रिया अद्याप सुशांतच्या दुःखातून सावरली नाही, म्हणाली...

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनाच्या धक्क्यातून अजूनही त्याचे फॅन्स सावरले नाहीत. सुशांतच्या निधनानंतर त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती वादाच्या भोवऱ्यात आली होती. सुशांतच्या कुटुंबियांनी रियावर अनेक आरोप केले होते. सुशांतच्या निधनाबाबत रियावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर दुसरीकडे ड्रग्सप्रकरणी रियाला तुरुंगाची हवाही खावी लागली. सुशांतच्या निधनानंतर पहिल्यांदाच रियाने एक प्रतिक्रिया दिली आहे, जिममधून बाहेर आल्यानंतर रियाने आपण अद्याप सावरण्याचा प्रयत्न करीत असल्याचे म्हटले आहे. (Rhea Chakraborty on Sushant’s Death)

काही दिवस तुरुंगात काढल्यानंतर आता रिया सामान्य आयुष्य जगण्याचा प्रयत्न करीत आहे. रिया आपले आयुष्य हळू हळू नॉर्मल करण्याचा प्रयत्न करीत आहे. रिया हल्ली नेहमी जिमबाहेर दिसते. रियाला पाहताच फोटोग्राफर्सची तिला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी धडपड सुरु असते. नुकतेच फोटोग्राफर्सने रियाची विचारपूस केली असता रियाने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आलीय.

जाणून घ्या काय म्हणाली रिया?

रिया चक्रवर्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये रिया जिममधून बाहेर येताना दिसत आहे. रियाला पाहताच फोटोग्राफर्स तिला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी धडपड सुरु आहे. यानंतर फोटोग्राफर्स तिला विचारत आहेत, ‘हॅलो रिया मॅम… कैसी हैं आप?’ यावर रिया शांतपणे प्रतिक्रिया देताना दिसत आहे.

रिया म्हणाली, आता ठिक होत आहे. एवढंच बोलून रिया कारमध्ये बसून निघून जाते. या व्हिडिओमध्ये रियाने ब्लॅक टी-शर्ट आणि ब्लॅक प्रिंटेड लोवर परिधान केले आहे. तिने तोंडाला मास्क लावला आहे. हातात पाण्याची बाटली आहे.

सुशांतसिंहच्या निधनानंतर रियाने सुशांतसोबतच्या आपल्या नात्याची सोशल मीडियावर कबुली दिली होती. सुशांतच्या निधनाच्या एक महिन्यानंतर रियाने एक भावनिक पोस्ट शेयर केली होती. या पोस्टमध्ये सुशांतने आपल्याला प्रेम करायला शिकवल्याचे तिने म्हटलेय. रियाने गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सीबीआय तपासाची मागणी केली होती. मात्र सुशांतच्या कुटुंबियांनी रियाविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण लागले. सध्या सुशांतच्या निधनाचा तपास सीबीआय करीत आहे.

इतर बातम्या

Drugs Case : सुशांत सिंग प्रकरणी एनसीबीला आणखी एक यश, महत्त्वाचा आरोपी अटकेत

Sooryavanshi Releas | अक्षय आणि कतरिनाच्या चाहत्यांना धक्का, सूर्यवंशीच्या निर्मात्यांनी केला मोठा खुलासा!

(Rhea Chakraborty spotted Outside gym in mumbai and she said she is now feeling good)

Published On - 10:55 pm, Fri, 5 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI