AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुप्रिया नाही तर या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात होते सचिन पिळगावकर, पण…

सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे. त्यांनी या पुस्तकासाठी अभिनेत्रीची परवानगी देखील घेतली होती.

सुप्रिया नाही तर या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात होते सचिन पिळगावकर, पण...
Sachin PilgaonkarImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 25, 2025 | 6:54 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीत सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांना एक आदर्श जोडी म्हणून ओळखलं जातं. त्यांची प्रेमकहाणी आपण अनेकदा ऐकली असेल, पण तुम्हाला माहित आहे का की, सुप्रियाशी लग्नापूर्वी सचिन एका अभिनेत्रीच्या प्रेमात पूर्णपणे बुडाले होते? ती अभिनेत्री होती कमल हसन यांची पूर्वाश्रमीची पत्नी आणि सचिन यांची सहकलाकार सारिका ठाकूर. 1975 साली ‘गीत गाता चल’ या चित्रपटाच्या सेटवर सचिन आणि सारिका यांची पहिली भेट झाली. त्यावेळी सचिन केवळ 18 वर्षांचे होते.

सारिकाचे मराठी मूळ

फार कमी लोकांना माहित आहे की, सारिका मूळची मराठी होती. तिचे आडनाव ठाकूर, तिची आई राजपूत आणि वडील सावंत होते. सारिकाच्या आई-वडिलांचे नातं टिकले नाही आणि ती लहान असतानाच तिची आई तिला घेऊन घराबाहेर पडली होती.

‘गीत गाता चल’मधील जादू

‘गीत गाता चल’ चित्रपटातील सचिन आणि सारिका यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना भुरळ घातली. त्यांची जोडी धर्मेंद्र-हेमामालिनी यांच्या जोडीइतकीच लोकप्रिय झाली. दोघांनी एकत्र जवळपास आठ-दहा चित्रपटांत काम केलं. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते कधी एकमेकांच्या प्रेमात पडले, हे त्यांनाही कळलं नाही.

वाचा: सुंदर काकीच्या प्रेमात दोन पुतणे, नवऱ्याने नको त्या अवस्थेत पकडलं अन्… कळल्यावर पोलिसांचाही घाम फुटला

‘अखियों के झरोकों से’ची निर्मिती

या यशाच्या लाटेवर सचिनने राजश्री प्रॉडक्शन्सचे राजबाबूंना एका नव्या चित्रपटाची कल्पना सांगितली, जी ‘लव्ह स्टोरी’ या इंग्रजी चित्रपटावर आधारित होती. या कथेत एका तरुण जोडप्याचं प्रेम, त्यांचा लग्नाचा निर्णय आणि नायिकेला कर्करोग झाल्याने तिचा मृत्यू अशी हृदयस्पर्शी कहाणी होती. सचिनला ही कथा इतकी आवडली की, त्याने राजबाबूंना ती मराठीत उतरवण्याची विनंती केली. राजबाबूंनी ही कल्पना मान्य केली, पण सांगितलं की ही कथा ‘नायिकाप्रधान’ असेल. सचिनने त्वरित उत्तर दिलं, “हरकत नाही! नायिकेची भूमिका तर सारिकाच करणार आहे, मग काय अडचण?” या आत्मविश्वासामुळे ‘अखियों के झरोकों से’च्या निर्मितीला सुरुवात झाली.

नात्यातील अडथळे

मात्र, याच काळात सचिन आणि सारिकाच्या नात्यात अडचणी येऊ लागल्या. त्याचवेळी ‘गोपालकृष्ण’ या दुसऱ्या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं, ज्यामध्ये दोघंही काम करत होते. काही शूटिंग आणि एका गाण्याचं चित्रीकरण पूर्ण झालं होतं, पण सेटवर काहीतरी गडबड आहे, असं सचिनच्या लक्षात येत होतं. प्रत्यक्षात, सारिकाच्या आईला त्यांचं नातं मान्य नव्हतं. तिला वाटत होतं की, या जवळीकीमुळे सारिकाच्या करिअरवर परिणाम होईल. याच कारणाने तिने राजश्री प्रॉडक्शन्सच्या कार्यालयात जाऊन सचिनला चित्रपटातून काढण्याची मागणी केली. त्या म्हणाल्या, “आम्हाला सचिनसोबत काम करायचं नाही. त्याला बदला.”

राजबाबूंचा ठाम निर्णय

राजबाबूंनी या मागणीला स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले, “सचिनबद्दल कोणतीही तक्रार नाही. जर सारिकाला काम करायचं नसेल, तर ती सांगू शकते. आम्ही दुसरी नायिका घेऊ.” यावर सारिकाच्या आईने ठामपणे सांगितलं, “मग दुसरी नायिका घ्या. आम्ही काम करणार नाही.” या मतभेदांमुळे सारिकाला ‘गोपालकृष्ण’मधून बाहेर पडावं लागलं. सचिनने या प्रकरणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने राजबाबूंना सांगितलं, “सारिकाला चित्रपट सोडायचा असेल, तर मला हरकत नाही. पण री-शूटमुळे खर्च वाढेल, हे लक्षात ठेवा.” सारिकाच्या जागी झरीना वहाब यांची निवड झाली, पण ‘गोपालकृष्ण’ हा चित्रपट फारसा यशस्वी झाला नाही.

‘अखियों के झरोकों से’चे यश

दरम्यान, ‘अखियों के झरोकों से’चे काम पुढे सरकत होते. या चित्रपटात रंजिताने मुख्य भूमिका साकारली. हा चित्रपट ‘गोपालकृष्ण’च्या आधी प्रदर्शित झाला आणि प्रचंड यशस्वी ठरला. प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. मात्र, या यशातही सचिन आणि सारिकाचं नातं तुटण्याच्या मार्गावर होतं. सारिकाच्या आईच्या विरोधामुळे आणि राजश्री प्रॉडक्शन्सशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांचं व्यावसायिक आणि वैयक्तिक नातं तुटलं. तरीही, सचिन आणि सारिकाने एकमेकांबद्दलचा आदर आणि मैत्री कायम ठेवली, जी पुढेही टिकून राहिली.

सचिन यांचं मनोगत

आपल्या नात्याबद्दल बोलताना सचिन म्हणतात, “सारिका आणि माझ्यातील प्रेम हे उथळ किंवा फक्त आकर्षण नव्हतं. आमचं प्रेम खरं आणि खोलवर होतं. It was an affair to remember. तरीही आमच्यात कधीच शारीरिक जवळीक नव्हती. याचं कारण म्हणजे आम्हाला एकमेकांशी लग्न करायचं होतं. आमचं नातं हे आदर आणि प्रेमावर आधारित होतं, केवळ तरुणपणातील आकर्षणावर नाही.”

सारिकाचं पुढील आयुष्य

‘अखियों के झरोकों से’च्या यशाने सचिनच्या करिअरला नवं बळ मिळालं, पण सारिकासोबतच्या त्या काळातील आठवणी त्याच्या मनात कायम राहिल्या. सारिकाने पुढे कमल हसन यांच्याशी लग्न केलं आणि ती चेन्नईला स्थायिक झाली. तरीही, त्यांच्यातील मैत्री कायम राहिली. एकदा सारिका गच्चीवरून पडल्याने लीलावती रुग्णालयात दाखल झाली होती, तेव्हा सचिन तिला भेटायला गेला. सारिकाच्या आयुष्यातील दुःख आणि त्रास पाहता सचिनला वाटतं की, ती नेहमीच कठीण प्रसंगांतून गेली. तिने देवावरचा विश्वासही गमावला, पण सचिनशी असलेलं तिचं नातं तिने जपलं.

सारिकाची परवानगी

सचिनने आपल्या पुस्तकात या नात्याबद्दल लिहिण्यापूर्वी सारिकाची परवानगी घेतली. तिने त्याला पूर्ण पाठिंबा दिला आणि म्हणाली, “तू जे लिहिशील, त्यात काहीच चूक नसेल.” आजही त्यांच्यातील मैत्री आणि आदर कायम आहे.

काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.