प्रिन्स मामाचा बदला घ्यायला आर्ची-परशाचं पोरगं येणार!

मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराट सिनेमा कदाचितच कुणी विसरलं असेल. या सिनेमातील गाण्यांवर लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अजूनही थिरकतात. पण सिनेमातील शेवटचा क्षण, जिथे लव्ह स्टोरी पाहणारे आणि गाणी एंजॉय करणारे प्रेक्षक स्तब्ध होतात. सिनेमातील नायक-नायिका आर्ची आणि परशा यांना ठार मारलं जातं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आर्ची आणि परशा यांच्यावर सैराट सिनेमा संपला होता. …

प्रिन्स मामाचा बदला घ्यायला आर्ची-परशाचं पोरगं येणार!

मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराट सिनेमा कदाचितच कुणी विसरलं असेल. या सिनेमातील गाण्यांवर लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अजूनही थिरकतात. पण सिनेमातील शेवटचा क्षण, जिथे लव्ह स्टोरी पाहणारे आणि गाणी एंजॉय करणारे प्रेक्षक स्तब्ध होतात. सिनेमातील नायक-नायिका आर्ची आणि परशा यांना ठार मारलं जातं.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आर्ची आणि परशा यांच्यावर सैराट सिनेमा संपला होता. पण त्यापुढे काय झालं? आर्ची आणि परशाच्या मुलाचं काय झालं? आर्ची आणि परशाची हत्या कशी आणि कुणी केली? याबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. पण आता या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळण्याची शक्यता आहे. सैराट 2 सिनेमाच्या सिक्वेलवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.

सैराट सिनेमाच्या सिक्वेलबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या पुण्यातील घरी एक बैठक झाल्याचंही बोललं जातं. शिवाय चित्रपट महामंडळाच्या पुणे शाखेत सिनेमाच्या टायटलचीही नोंदणी झाली आहे. त्यामुळे आता आर्ची आणि परशा यांच्या मृत्यूवर संपलेली स्टोरी पुढे कशी असेल याविषयी चर्चा सुरु झाल्या आहेत.

सैराट सिनेमात आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु आणि परशा म्हणजेच आकाश ठोसर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन दोघे लग्न करतात. त्यांना मुलही होतं. पण या पती-पत्नींची हत्या केली जाते आणि इथेच सिनेमाचा शेवट होतो.

सैराट सिनेमाने मराठीत कमाईचे सर्व विक्रम मोडले होते. हा सिनेमा सुपरहिट झाला तेव्हाच सिक्वलसाठीच्या स्क्रीप्ट आणि आयडिया सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. नागराज मंजुळे यांनीही सिनेमाच्या सिक्वलबाबत नकार दिला नव्हता. त्यामुळे आता नव्या कलाकारांसह नागराज मंजुळे पुन्हा एकदा एक सुपरहिट चित्रपट देण्याच्या तयारीत आहेत.

नागराज मंजुळे सध्या झुंड या हिंदी सिनेमावर काम करत असून या सिनेमाची शुटिंग सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच बिग बी अमिताभ बच्चन या सिनेमाच्या शुटिंगसाठी नागपुरात गेले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *