AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भररस्त्यात सर्वांसमोर ढसाढसा रडलेला सलमान खान…, भाईजानबद्दल मोठं सत्य अखेर समोर

सलमान खान याच्या मनात 'सौ दर्द...', त्यादिवशी भररस्त्यात सर्वांसमोर ढसाढसा रडलेला सलमान खान..., भाईजान बद्दल मोठा खुलासा करणारी 'ती' कोण? सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतो चर्चेत...

भररस्त्यात सर्वांसमोर ढसाढसा रडलेला सलमान खान..., भाईजानबद्दल मोठं सत्य अखेर समोर
अभिनेता सलमान खान
| Updated on: Apr 05, 2026 | 3:41 PM
Share

अभिनेता सलमान खान फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील कामय चर्चेत असतो, खुद्द सलमान खान याने देखील स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहे. एवढंच नाही तर, रिलेशनशिपबद्दल देखील अभिनेता म्हणाला आहे. सलमान खान याच्या रिलेशनशिपबद्दल तर आज प्रत्येकाला माहिती आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत, ज्यामध्ये दिग्दर्शिका आणि कोरियोग्राफर फराह खान हिने सलमान खान याच्याबद्दल मोठा खुलासा केलेला. theranveershowpodcast या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये फराह म्हणते, ‘सलमान खान कधीच स्वतःच्या मनातील दुःख कोणाला सांगत नाही. पण मनातून मेणासारखा आहे. माझं मन तेव्हा दुखावलं जेव्हा ब्रूकलिन ब्रिजवर रडलायना, तेव्हा तो खरंच रडला आहे. जर तुम्ही ते गाणं पाहिलं तर कळेल, कोणत्याच प्रकारचं ग्लिसरीन वापरण्यात आलेलं नाही. तो खरंच तेव्हा त्या पुलावर रडला आहे. ती एक जादू होती आणि त्यानंतर त्याला पाहिल्यानंतर मला देखील रडू आवरलं नाही…’, “सौ दर्द हैं, सौ राहतें” असं त्या गाण्याचं नाव आहे.

ब्रूकलिन ब्रिजबद्दल सांगायचं झालं तर, ब्रूकलिन ब्रिज (Brooklyn Bridge) हा अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात ईस्ट रिव्हरवर बांधलेला. या ब्रिजवर अनेक सिनेमांसाठी शुटिंग झालं आहे. अभिनेता सलमान खान स्टारर ‘जान-ए-मन’ (Jaan-E-Mann) सिनेमातील “सौ दर्द हैं, सौ राहतें” (Sau Dard Hai) गाणं याच ब्रिजवर शूट झालं असून, गाण्यात भाईजान ढसाढसा रडताना दिसला. सिनेमात सलमान आणि अभिनेत्री प्रिती झिंटा यांनी एकत्र स्क्रिन शेअर केलेली. गाणं आजही अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. सिनेमा 2006 मध्ये प्रदर्शित झालेला.

“सौ दर्द हैं, सौ राहतें” गाण्याबद्दल सांगायचं झालं तर, हे एक रोमँटिक गाणं असून, गाणं गायक सोनू निगम याने गायलं होतं. तर अनू मलिक यांनी संगीत दिलं होतं आणि गाण्याचे बोल गुलजार यांनी लिहिले होतं… आजही हे गाणं चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे…

सलमान खान याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलंं. पण अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत असलेलं सलमान याचं नातं आजही चर्चेत असतं… ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमात दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. दोघांच्या लग्नाच्या चर्चांनी देखील जोर धरलेला, पण त्यांच्या नात्याचा अंत फार वाईट झाला.

Follow Us
हागाईचा भडका कष्टकऱ्यांचं कंबरडं मोडलं; सुप्रिया सुळेंनी सरकारला घेरलं
Supriya Sule | सण तोंडावर, महागाईचा भडका! कष्टकऱ्यांचं कंबरडं मोडलं; सुप्रिया सुळेंनी सरकारला घेरलं
ठाकरे गटाची बाजू... शिवसेना सुनावणी आधीच मोठा धमाका? बड्या वकिलाचं...
ठाकरे गटाची बाजू... शिवसेना सुनावणी आधीच मोठा धमाका? बड्या वकिलाचं विधान चर्चेत
पुण्यात गणेशोत्सवाआधी DJ वरून वाद पेटला! डीजे बंद करा, अन्यथा...
Pune Ganeshotsav 2026 | पुण्यात गणेशोत्सवाआधी DJ वरून वाद पेटला! डीजे बंद करा, अन्यथा मोठं आंदोलन उभारू
CSMT बाहेर महागाईविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन, कार्यकर्ते आक्रमक
CSMT स्थानकाबाहेर महागाईविरोधात सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादी नेत्यांचे आंदोलन
माझ्या राजीनाम्याची... MPSC पेपरफुटीच्या वादावर स्वतः अध्यक्षांचं...
माझ्या राजीनाम्याची... MPSC पेपरफुटीच्या वादावर स्वतः अध्यक्षांचे मोठं विधान, काय म्हणाले?
गणेशोत्सवात नागपुरातही डीजे बंदीची मागणी; सार्वजनिक मंडळांची नाराजी
गणेशोत्सवात नागपुरातही डीजे बंदीची मागणी; सार्वजनिक मंडळांची नाराजी
FDA ची सर्वात मोठी कारवाई! बड्या फूड डिलिव्हरी कंपनीचा थेट...
FDA ची सर्वात मोठी कारवाई! बड्या फूड डिलिव्हरी कंपनीचा परवाना निलंबित
काँग्रेस पक्ष मोठ्या तयारीत? नाशिकमध्येच... राहुल गांधींच्या उपस्थितीत
काँग्रेस पक्ष मोठ्या तयारीत? नाशिकमध्येच... राहुल गांधींच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
मोदी म्हणाले गरज नसेल तर सोनं खरेदी करू नका, अन् बाजारात मोठी घसरण!
Gold And Silver Rate Hike | पंतप्रधान मोदी म्हणाले गरज नसेल तर सोनं खरेदी करू नका, अन् बाजारात मोठी घसरण! सोनं तब्बल ₹4,950 तर चांदी ₹8,000 ने घसरली
आता 100 टक्के न्याय मिळेल! दिशा सालियनच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर
आता 100 टक्के न्याय मिळेल! दिशा सालियन यांच्या वडिलांची CBI तपासानंतर पहिली प्रतिक्रिया समोर