AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तेरे नाम’च्या सेटवरील ही एक गोष्ट सलमान खानने अजूनही स्वत:जवळ जपून ठेवलीये; 22 वर्षांनी केला खुलासा

सलमान खानचा असा एक चित्रपट ज्याने प्रेक्षकांना वेड लावलं होतं.या चित्रपटाची गाणी, कथा सगळंच हीट ठरलं होतं. पण सलमान खानने या चित्रपटाच्या सेटवरील एक गोष्ट अजूनही त्याच्याकडे जपून ठेवली आहे.

'तेरे नाम'च्या सेटवरील ही एक गोष्ट सलमान खानने अजूनही स्वत:जवळ जपून ठेवलीये; 22 वर्षांनी केला खुलासा
tere naamImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 19, 2025 | 4:28 PM
Share

सलमान खानचे असे अनेक चित्रपट आहेत ज्यामुळे एक नवीन ट्रेंड प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला. प्रत्येक चित्रपटात सलमान खानने लूकपासून ते चित्रपटेच्या कथेपर्यंत प्रत्येकवेळी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला. 2003 मध्ये सलमान खानचा असाच एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाने लोकांचं मनोरंजन तर केलंच पण सलमान खानच्या अभिनयाची एक नवीन बाजू देखील दाखवली. लोक त्याचे इतके वेडे झाले की लोकांनी या चित्रपटातील सलमानचा लूक आणि त्याच्या ड्रेसिंग स्टाईलची कॉपी करायला सुरुवात केली.

सलमान खानचे लांब केस इतके ट्रेंड बनले

हा चित्रपट म्हणजे ‘तेरे नाम’. या चित्रपटाची कथा जितकी पसंत केली गेली तेवढेच त्यातील गाणे देखील प्रसिद्ध आहे. आजही ते गाणे आवर्जून ऐकले जातात. हा चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरूम प्रतिसाद मिळाला होताया चित्रपटातील सलमान खानच्या अभिनयाचे सर्वांनी खूप कौतुक केले. सलमानने राधे मोहन म्हणून थिएटरवर धुमाकूळ घातला होता.सलमान खानचे लांब केस इतके ट्रेंड बनले की हेअर सलूनने त्याच्या नावाने हेअरकट देण्यास सुरुवात केली. पण हे फार कमी लोकांना माहित असेल की या चित्रपटाच्या यशानंतर सलमान खानने सेटवरील एक गोष्ट आजपर्यंत स्वतःकडे जपून ठेवली आहे.

‘तेरे नाम’ या हिट चित्रपटाशी संबंधित एक किस्सा सर्वांसोबत शेअर केला

नुकताच सलमान खान मुंबईत एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्यावेळी मीडियाशी संवाद साधतानाचे त्याचे अनेक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमादरम्यान सलमान खानने त्याच्या ‘तेरे नाम’ या हिट चित्रपटाशी संबंधित एक किस्सा सर्वांसोबत शेअर केला. कार्यक्रमादरम्यान त्याला विचारण्यात आलं की त्याला बाईक आवडतात का? आणि त्याच्या अजूनही चित्रपटाच्या सेटवरील काही आठवणी आहेत का.

सेटवरील ती गोष्ट आजही सलमान खानने जपून ठेवली 

या प्रश्नाचे उत्तर देताना सलमान खानने सांगितले की, “तेरे नामच्या सेटवरील बाईक, अजूनही माझ्याकडे आहे.” सलमान कदाचित जास्त बाईक चालवत नसेल, पण त्याला बाईकची खूप आवड आहे. त्याने अनेक चित्रपटांसाठी बाईक चालवून आपली ही आवडही जपली आहे. तेरे नामच्या सेटवरील ही बाईक अजूनही त्याने जपून ठेवली आहे.

‘बॅटल ऑफ गलवान’ बद्दल काय म्हणाला सलमान?

कामाबद्दल बोलायचे झाले तर, सलमान खानने अलिकडेच अपूर्व लाखियासोबतचा त्याचा पुढचा चित्रपट ‘बॅटल ऑफ गलवान’ बद्दलही अनेक गोष्टी सांगितल्या. 2020 मध्ये भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या गलवान खोऱ्यातील युद्धावर आधारित हा चित्रपट चर्चेत आला आहे. सलमान या चित्रपटासाठी खूप मेहनत घेत आहे.नवीन चित्रपटाविषयी बोलताना तो म्हणाला, “हे शारीरिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक आहे. दरवर्षी, दर महिन्याला, दररोज ते अधिक कठीण होत चालले आहे. आता मला जास्त वेळ द्यावा लागतो. पूर्वी मी ते एक-दोन आठवड्यात पूर्ण करायचो, पण आता मी धावतो. लाथ मारतो, मुक्का मारतो आणि हे सर्व करतो.”

लडाखमध्ये, उंचावर आणि थंड पाण्यात शूटिंग

सलमान म्हणाला, “या चित्रपटात यासाठीच जास्त मागणी आहे. उदाहरणार्थ, ‘सिकंदर’मध्ये अ‍ॅक्शन वेगळी होती, पात्र वेगळं होतं. पण आताच्या गोष्टी या शारीरिकदृष्ट्या कठीण आहे, विशेषतः लडाखमध्ये, उंचावर आणि थंड पाण्यात शूटिंग करणे.”

सलमानने त्याच्या शूटिंग वेळापत्रकाबद्दलही सांगितलं. तो म्हणाला, “मला लडाखमध्ये 20 दिवस आणि नंतर सात-आठ दिवस थंड पाण्यात शुटींग करावी लागणार आहे. ‘बॅटल ऑफ गलवान’ मध्ये सलमान खान एका सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.