AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानने खऱ्या चाकूने माझा गळा जोरात दाबला अन्… अशोक सराफांनी सांगितली ती घटना

 अशोक सराफ यांनी सलमान खानसोबत काम करतानाचा एका चित्रपटातील एक प्रसंग सांगितला. या चित्रपटातील एका सीनवेळी सलमान खरोखरंच अशोक सराफ यांचा गळा चाकूने दाबत होता. त्यामुळे त्यांच्या गळ्याला छोटा कटही पडला होता. नक्की काय घडलं होतं. 

सलमान खानने खऱ्या चाकूने माझा गळा जोरात दाबला अन्... अशोक सराफांनी सांगितली ती घटना
ashok saraf and salman khanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 28, 2025 | 5:22 PM
Share

अशोक सराफ यांनी हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाने एक खास छाप सोडली आहे. अशोक सराफ हे अनेक मुलाखतींमध्ये त्यांचे बॉलिवूडमधील किस्से सांगताना दिसतात. अशोक सराफ यांनी सलमान खानसोबतचा एक प्रसंग शेअर केला आहे. अशोक सराफ यांनी सलमान खानसोबत ‘जागृती’ या चित्रपटात काम केले आहे. त्यांनी शूटिंग दरम्यानचा एक किस्सा सांगितला. एका सीनमध्ये सलमानने खरोखरंच अशोक सराफांच्या गळ्यावर चाकू इतक्या जोरात धरला होता. नक्की काय घडलं होतं जाणून घेऊयात.

अशोक सराफ यांनी खलनायकाची भूमिका केली

जागृती चित्रपटात अशोक सराफ यांनी खलनायकाची भूमिका केली होती. एका पॉडकास्ट दरम्यान त्यांनी सांगितलं की शूटिंग दरम्यान सलमानने त्याच्या मानेवर अशा प्रकारे चाकू धरला होता की त्याची खोलवर जखम झाली झाली होती. अशोक सराफ म्हणाले की जर त्यावेळी नस कापली असती तर काहीतरी भयंकर घडले असते. ते देखील ही घटना विसरू शकलेले नाही. सलमान खानचा जागृती हा चित्रपट 3 जून 1992 रोजी प्रदर्शित झाला होता.

गळा कापला गेला अन्…

अशोक सराफ म्हणाले, ‘त्याने माझ्या गळ्यावर चाकू धरला होता आणि तो चाकू खरा होता. चाकू गळ्यावर इतका जोरात लागला रक्त यायला लागलं. मी संवाद बोलायला सुरुवात करताच मी त्याच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न केला. सलमान माझा गळा जोरात दाबत होता म्हणून मी म्हणालो, ‘हळू दाबा, गळा कापत आहे’,त्यावर तो म्हणाला मग काय करायला हवं? मी त्याला चाकू उलटा धरायला सांगितला. तो म्हणाला की कॅमेरा त्याच्या दिशेने आहे, त्यात ते दिसून येईल, म्हणून मी विचार केला की जाऊ दे. आम्ही तो सीन केला आणि जेव्हा मी नंतर पाहिले तेव्हा माझ्या गळ्यावर खोलवर कट होता. जर तिथली नस कापली गेली असती तर मी तिथेच गेलो असतो… मी कधीही ते विसरणार नाही, सलमानला कदाचित ते आठवतं की नाही हे मला माहित नाही. तसही अशी लोक कोणाला आठवत नाही, ते त्यांना विसरतात.’

जागृतीची कहाणी काय होती?

‘जागृती’ या चित्रपटात सलमान खानसोबत करिश्मा कपूर देखील आहे. अशोक सराफ यांनी खलनायक सेवालालची भूमिका साकारली आहे. चित्रपटात सेवालाल एका प्रामाणिक कस्टम अधिकारी विशालची हत्या करवतो. त्याचा धाकटा भाऊ जुगनूलाही मृत समजले जाते. जुगनू वाचतो आणि एका टोळीने त्याला वाचवलेले असते आणि त्याला प्रशिक्षण दिले जाते. जुगनू त्याच्या भावाच्या मृत्यूचा बदला घेतो. सलमान खानने चित्रपटात जुगनूची भूमिका साकारली आहे.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.