एयर होस्टेस प्रार्थना करत होती, पायलट घाबरलेला…, विमानातील ते 45 मिनिटं, जीव मुठीत घेऊन बसलेला सलमान खान
Salman Khan on flight Experience: विमान प्रवासात जीव मुठीत घेऊन बसलेला सलमान खान, ती धक्कादायक घटना सांगत म्हणाला, 'एयर होस्टेस प्रार्थना करत होती, पायलट घाबरलेला...', सलमान खानच्या वक्तव्याची चर्चा...

Salman Khan on flight Experience: गुरुवारी अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अपघातात प्राण गमावलेव्या प्रवाशांबद्दल अभिनेता सलमान खान याने दुःख वक्त करत एक इव्हेंट रद्द केला आहे. एवढंच नाही तर, सलमान खान याने यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात भायनक अनुभवाचा सामना केला. 45 मिनिटं अभिनेता विमानात जीव मुठीत घेऊन बसला होता.
सलमान खान भाऊ सोहेल खान आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्यासोबत एका पुरस्कार सोहळ्यातून परतत होता. तेव्हा अभिनेत्याला तब्बल 45 मिनिटं टर्बुलेन्सचा सामना करावा लागला. अनुभव सांगत सलमान खान म्हणाला, ‘आयफा पुरस्कार सोहळा झाल्यानंतर आम्ही श्रीमंकेहून भारतात परतत होतो. आम्ही सगळे आनंदात होतो. तेवढ्यात विमान हलू लागला.’
View this post on Instagram
‘सुरुवातीला वाटलं सर्वकाही ठिक आहे. पण नंतर अवस्था आणखी वाईट झाली. जेव्हा मी सोहेलकडे पाहिलं तो झोपलेला होता. मी एयर होस्टसला प्रार्थना करताना पाहिलं आणि प्रचंड घाबरलो… पायलट देखील गंभीर होता. त्यानंतर ऑक्सिजन खाली पडले… विचार केला.. हे सर्व फक्त सिनेमांमध्ये पाहिलं आहे.’
View this post on Instagram
सलमान खान पुढे म्हणाला, ’45 मिनिटांनंतर विमान हलणं बंद झालं आणि लोकं पुन्हा हसू लगले. पण चेहऱ्यावरचा आनंद फार काळ टिकला नाही. 10 मिनिटांनंतर पुन्हा टर्बुलेन्सचा सामना करावा लागला…’ असं सलमान खान याने सांगितलं.
अहमदाबाद विमान अपघात
गुरुवारी अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात मृतांचा आकडा आता 270 वर पोहोचला आहे. लंडनला जाणाऱ्या बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमानाच्या अपघातानंतर शुक्रवार ते शनिवारी रात्री 9 वाजेपर्यंत 31 मृतदेहांचे डीएनए प्रोफाइलिंग यशस्वीरित्या पूर्ण झाले. तर 12 मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आले आहेत.
