AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan : सलमान खानची संपत्ती किती ? भाईने कुठे गुंतवलाय पैसा ?

खास मित्र असलेल्या बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर अभिनेता सलमान खान चांगलाच हादरला आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून त्याला सतत जीवे मारण्याचा धमक्या मिळत असतात. त्याच पार्श्वभूमीवर सलमानच्या सुरक्षेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. त्याच्या सुरक्षेबद्दल त्याच्या कुटुंबियांच्या मनातही चिंता आहे.

Salman Khan : सलमान खानची संपत्ती किती ? भाईने कुठे गुंतवलाय पैसा ?
सलमान खानImage Credit source: instagram
| Updated on: Oct 19, 2024 | 11:39 AM
Share

माजी मंत्री, राजकारणी बाबा सिद्दीकी यांची वांद्रे येथे हत्या झाली, या घटनेला आज आठवडा पूर्ण झाला. लॉरेन्स बिन्शोई टोळीने या हत्येची जबाबदारी घेतली असून अभिनेता सलमान खान याच्याशी असलेल्या जवळकीमुळे बाबा सिद्दीकी यांना जीव गमवावा लागला असे बोलले जात आहे. लॉरेन्स बिश्नोई सलमानच्या जीवावार उठला असून त्याने कित्येकदा त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. एप्रिल महिन्यात तर त्याच्या घराबाहेर गोळीबारही करण्यात आला होता. आणि आता सलमानच्या जवळच्या मित्रांपैकी असलेल्या सिद्दीकी यांचीही हत्या झाली. याच सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर सलमानच्या सुरक्षेत अनक पटीने वाढ करण्यात आली असून त्याच्या घराबाहेरही कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याचदरम्यान सलमानने महत्वाचे पाऊल उचललं असून त्याने स्वतःच्या सुरक्षेसाठी 2 कोटी रुपयांची बुलेटप्रूफ कार विकत घेतली आहे. सलमानने बुलेट प्रूफ असलेली नवी निसान पेट्रोल एसयूव्ही खरेदी केली आहे

काही दिवसांपूर्वीच सलमानवला पुनहा धमकी देण्यात आली होती. लॉरेन बिश्नोई गँगशी सुरू असलेले वैर संपवायचे असेल तर 5 कोटी रुपये द्या असा धमकीचा मेसेज ट्राफिक पोलिसांच्या नंबरवर आला होता. तसेच हा मेसेज हलक्यात घेऊ नका. अन्यथा सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकींपेक्षा खूप वाईट होईल असा इशारही या मेसेजमधून देण्यात आला होता.

या सर्वच गोष्टीमुळे सलमान प्रचंड चर्चेत आहे. त्याने कक सुरक्षा व्यवस्थेत पुन्हा बिग बॉस 18 चे शूटिंग सुरू केलं आहे. तीन दशकांहून अधिक का बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या भाईची संपत्ती किती आहे, त्याने कुठे-कुठे गुंतवणूक केली आहे, ते जाणून घेऊया.

सलमान खानची कमाई आणि प्रॉपर्टी

सलमान खान तीन दशकांहून अधिक काळ या इंडस्ट्रीत आहे. गेल्या काही वर्षांत सलमान खानने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामुळे आज तो एक ब्रँडही बनला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खान हा एकू 3000 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. सलमान खान केवळ चित्रपटांमध्येच नायकाच्या भूमिकेत दिसत नाही तर तो टीव्हीवरील बिग बॉस या प्रसिद्ध रिॲलिटी शोच्या अनेक सीझनचे सूत्रसंचालनही करतो. एवढंच नव्हे तर सलमान खान अनेक ब्रँडच्या जाहिरातींमध्येही दिसतो. सलमानने भारतात आणि दुबईतील अनेक सुंदर ठिकाणी आलिशान मालमत्ताही खरेदी केल्या आहेत. चित्रपट निर्मितीपासून ते फिटनेस आणि पर्सनल केअर ब्रँड्सपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये सलमानने भक्कम गुंतवणूक केली आहे.

दबंग स्टारने कुठे कुठे गंतवणूक केली आहे तेही जाणून घेऊया.

सलमान खान फिल्म्स (Salman Khan Films)

सलमान खान चित्रपटात फक्त अभिनयच करत नाही तर त्याचं स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस देखील आहे. सलमान खान फिल्म्स असे या कंपनीचे नाव असून 2011 साली त्याची सुरूवात झाली. या निर्मिती संस्थेने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट बनवले आहेत.

बिईंग ह्यूमन (Being Human)

बिईंग ह्युमन हा सलमान खानचा कपड्यांचा ब्रँड लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. 2012 साली सलमानने हा कपड्यांचा ब्रँड लॉन्च केला होता. या ब्रँडचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातर्फे धर्मादाय संस्थांमध्ये योगदान देण्यात येते. त्याचा ब्रँड केवळ भारतापुरता मर्यादित नाही तर मिडिल ईस्ट आणि युरोपपर्यंत त्याचा विस्तार आहे.

एसके-27 जिम (SK-27 Gym)

सलमानची बॉडी, त्याच्या फिटनेसचे लाखो चाहते आहेत. त्यामुळेच सलमानने कपड्यांव्यतिरिक्त जिम आणि फिटनेस उपकरणांच्या ब्रँडमध्येही गुंतवणूक केली आहे. सलमान खान खूप फिटनेस फ्रीक आहे. त्याने 2019 मध्ये SK-27 जिम नावाची फिटनेस सेंटरची साखळी उघडली होती.

एफआरएसएच (FRSH)

फिटनेसशिवाय सलमान खानने पर्सनल केअर ब्रँडमध्येही पैसे गुंतवले आहेत. Scentials Beauty Care and Wellness Pvt. FRSH ब्रँडसह भागीदारीत त्याने FRSH ब्रँडसह नवी सुरूवात केली.

यात्रा डॉट कॉम (Yatra.com)

यात्रा डॉट कॉम या ट्रॅव्हल कंपनीमध्येही सलमान खानने गुंतवणूक केली आहे. अभिनेत्याने 2012 मध्ये त्याचे 5 टक्के शेअर्स विकत घेतले होते, ज्याचा त्याला खूप फायदा झाला.

चिंगारी (Chingari)

आजच्या काळात शॉर्ट व्हिडिओ बनवण्याचा ट्रेंड खूप प्रसिद्ध आहे. असे छोटे व्हिडिओ बनवण्याचे एक लोकप्रिय व्यासपीठ म्हणजे चिंगारी, ज्याचा ब्रँड ॲम्बेसेडर हा खुद्द सलमान खान आहे.

सलमानच्या अपार्टमेंटची किंमत किती ?

मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान खान त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत राहतो. या तीन मजली सी फेसिंग अपार्टमेंटची किंमत 100 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अपार्टमेंटशिवाय सलमान खानच्या मुंबईत अनेक प्रॉपर्टी आहेत ज्यांची किंमत कोट्यवधींमध्ये आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.