Bigg Boss 18 Finale Date: सलमान खानचा शो बिग बॉस 18 कधी संपणार? विजेता कोण होणार?
Bigg Boss 18 Finale Date: बिग बॉस 18 शोबद्दल मोठी माहिती समोर, कधी संपणार अभिनेता सलमान खानचा शो 'बिग बॉस 18', शोचा विजेता कोण असेल? सध्या चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त 'बिग बॉस 18' ची चर्चा...

Bigg Boss 18 Finale Date: अभिनेता सलमान खान गेल्या अनेक वर्षांपासून ‘बिग बॉस’ शोच्या होस्टची धुरा सांभाळत आहे. सध्या सलमान खान ‘बिग बॉस 18’ शोमुळे चर्चेत आहे. ऑक्टोबर महिन्यात सुरु झालेल्या शोला आता 2 महिने पूर्ण झाले आहेत. शोमध्ये चाहत पांडे. विवियन डीसेना, करण वीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, कशिश कपूर, रजत दलाल, चुम दरांग, अविनाश मिश्रा हे सेलिब्रिटी आहे. सध्या बिग बॉसच्या घरात रोज नवीन ड्रामा पाहायला मिळत आहे.
कधी संपणार शो?
‘बिग बॉस’ शोच्या 18 व्या भागाला चाहत्यांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे. येत्या काही दिवसांमध्ये शो प्रेक्षकांचा निरोप घेईल असं देखील सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या एक महिन्यात ‘बिग बॉस 18’ शो संपणार आहे… असं सांगण्यात येत आहे. 19 जानेवारी रोजी ‘बिग बॉस 18’चा फिनाले असेल असं सांगण्यात येत आहे.
पण अद्याप शोच्या फिनालेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण बिग बॉस शो 19 जानेवारीला संपला तर, स्पर्धकांकडे चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी फक्त 1 महिना उरला आहे. मात्र, काही रिपोर्ट्सनुसार शोला एक्स्टेंशन मिळू शकतं. रिपोर्टनुसार, बिग बॉस 18 च्या फिनालेची तारीख 19 जानेवारी पक्की झाली नसून 8 किंवा 15 फेब्रुवारी देखील असू शकते. शोला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे… असं देखील सांगण्यात येत आहे.
कोण असेल ‘बिग बॉस 18’ चा विजेता?
‘बिग बॉस 18’ शोचा विजेता कोण होणार याबाबतही अनेक स्पर्धकांची नावे पुढे येत आहेत. चाहत्यांना त्यांचा आवडता स्पर्धक विजेता बनताना पाहायचा आहे. त्यामुळे शोचा फिनाले कधी आहे आणि शोचा विनर कोण होणार? याबाबत चाहत्यांच्या मनातील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सांगायचं झालं तर, शोच्या सर्व एपिसोडमध्ये सलमान खान याने होस्टची भूमिका पार पाडली नाही. काही अन्य कमिटमेंटमुळे सलमान खान याला होस्टची भूमिका पार पाडता आली नाही. तर सलमानच्या जागी फराह खान, रवी किशन, अनुराग कश्यप यांनी शोच्या होस्ट भूमिका पार पाडली.
‘बिग बॉस 18’ शोबद्दल सांगायचं झालं कर. करण वीर मेहरा आणि चूम दरांग यांच्यातील मैत्री टॉक ऑफ द टाउन झाली आहे. शोच्या सुरुवाती पासून दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते.