Bigg Boss 14 | सलमान खान राहुल वैद्यला म्हणाला, ‘गेट आऊट’, राहुल खरंच बिग बॉसचे घर सोडून जाणार?

Bigg Boss 14 | सलमान खान राहुल वैद्यला म्हणाला, 'गेट आऊट', राहुल खरंच बिग बॉसचे घर सोडून जाणार?

आजच्या होणारा वीकेंड का वारचा कलर्स टीव्हीने एक प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये बिग बॉसचे होस्ट सलमान खान घरातील सदस्य राहुल वैद्य यांना फटकारताना दिसत आहे.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

| Edited By: Akshay Adhav

Dec 05, 2020 | 9:28 PM

मुंबई : बिग बॉस 14 (Bigg Boss 14) चा आज फिनाले होणार आहे, हे ऐकून तुम्हाला धक्का बसला ना? खरतर, शोच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे ट्विस्ट आणले जात आहेत. या आठवड्यात अंतिम फेरीत पुढे जाणारे चार स्पर्धक आता जवळपास निश्चित झाले आहेत. एजाज खानला इम्युनिटी स्टोन मिळाल्यामुळे तो आधीच फायनलिस्ट आहे, तर अभिनव गुरुवारी ‘बोट अँड शार्क’ चा टास्क जिंकून दुसरा फायनलिस्ट झाला आहे.(Salman Khan told Rahul Vaidya to get out)

अंतिम फेरीच्या या शर्यतीत आता राहुल, निक्की, रुबीना आणि जास्मीन यापैकी फक्त दोन जणच पुढे जाणार आहेत तर उरलेल्या दोन जणांना घरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे.

आजच्या होणारा वीकेंड का वारचा कलर्स टीव्हीने एक प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये बिग बॉसचे होस्ट सलमान खान घरातील सदस्य राहुल वैद्य यांना फटकारताना दिसत आहे. या प्रोमोच्या कॅप्शनवर लिहिले आहे की, ‘राहुल वैद्य आज रात्री बिग बॉस 14 च्या घराचा निरोप घेणार? त्यामुळे आता प्रेक्षकही संभ्रात पडले आहे.

व्हिडिओमध्ये सलमाज खान राहुलला म्हणतो, ‘राहुल, तुला बिग बॉसच्या घरात राहण्याची इच्छा नाही का? यावर राहुल वैद्य उत्तर देतो की, हो मला बिग बॉसच्या घरात राहण्याची इच्छा नाहीये हे राहुलचे उत्तर ऐकल्यानंतर होस्ट सलमान खान म्हणतो, तुझ्यामध्ये उत्साह नाही आणि सलमान राहुलला फटकारताना तेव्हा राहुल वैद्य म्हणतो, सर मला यावर थोडेसे बोलायचे आहे. त्यावर सलमान खान राहुल वैद्यला म्हणतो, गरज नाही. कृपया राहुलला बाहेर सोडा. आता हे पाहण्या सारखे आहे, की खरोखरच राहुल बिग बॉसचे घर सोडून जाणार का?

निक्की तांबोळी राहुलची पोल खोलते निक्कीने राहुलवर एक गंभीर आरोप लावला आहे ती म्हणते की, राहुल माझ्या पीआर टीममधील मुलीला फ्लर्ट करतो. यावर राहुल म्हणतो की, ही गोष्ट 3 ते 4 वर्ष जुनी आहे. राहुल महिलांचा सन्मान करत नाही त्याला महिलांसोबत कसे बोलायचे ते कळत नाही, असे रुबीना दिलैक म्हणाली. निक्की तांबोळी, एजाज खान आणि अभिनव शुक्ला यांनी राहुल महिलांचा सन्मान करत नसल्याचे म्हटले आहे. यावर राहुल वैद्य म्हणतो की, रुबीना दिलैक आणि निक्की तांबोळी यांच्याबद्दल माझा मनात कुठल्याच प्रकारचा आदर नाही. त्यांची ती लायकीच नाही. बाकी मी महिलांचा आदर करतो.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | महाअंतिम सोहळ्याचे बिगुल वाजले, ‘बिग बॉस 14’च्या घरातून कविता कौशिकसुद्धा घराबाहेर?

Big Boss 14 | कविता कौशिकच्या पतीचा ‘बिग बॉस’ स्पर्धकावर आरोप, अभिनववर अप्रत्यक्ष निशाणा

(Salman Khan told Rahul Vaidya to get out)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें