घटस्फोटानंतर सानिया मिर्झाचं ‘लव्हलेटर’ समोर, सायना नेहवालचा नवरा म्हणाला…
सानिया मिर्झाने लिहिलेलं 'लव्ह लेटर' सोशल मीडियावर तुफान व्हायरल... फक्त चाहतेच नाही तर, सायना नेहवालच्या नवऱ्याची प्रतिक्रिया देखील समोर

Sania Mirza Shared Love Letter: माजी टेनिसपटू सानिया मिर्झा केवळ तिच्या खेळामुळेच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर सानिया अधिक चर्चेत आली. सानिया सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर पोस्ट करत सानिया चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील सानियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सानियाच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
सानिया हिने सोशल मीडियावर एक ‘लव्ह लेटर’ पोस्ट केलं आहे. सानियाने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्याला ‘लव्ह लेटर’ असं नाव दिलं आहे. सानियाने हे ‘लव्ह लेटर’ कोणत्या व्यक्तीसाठी नाही तर, एथलिट्ससाठी लिहिलं आहे. सध्या सानियाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
पोस्टमध्ये सानिया म्हणते, ‘कायम तुमच्या स्वप्नांचा विचार करा… तुमचं पॅशन फॉलो करा… ज्यामुळे तुम्हाला पैसे मिळतील, प्रवास करता येईल आणि लोकप्रितेत देखील मोठी वाढ होईल. पण खेळाला खेळापर्यंत ठेवणं देखील फार कठीण आहे. ज्यामुळे वाट्याला एकटेपणा देखील येतो… जेव्हा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडत नसतील तर किती अडचणी येतात…. तेव्हा विषेश लक्ष केंद्रीत करण्याची गरज भासते…’
पुढे सानिया म्हणते, ‘खेळाडूंना आयुष्यात अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. खेळाडूंना एक वेळ आल्यानंतर कळतं की त्यांना एका पैसा, पुरस्कार नकोय त्यांना फक्त लोकांचं प्रेम हवं असतं आणि हे फार कठिण आहे. पण याच प्रवासामुळे एका खेळाडूचं आयुष्या मार्गावर येतं…’ सध्या सानियाची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
सानियाच्या पोस्टवर सायना नेहवालच्या नवऱ्याची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. कॉमवेल्थ गेम्ल गोल्ड मेडलिस्ट परुपल्ली कश्यप याने सानियाच्या पोस्टवर फायर इमोजी पोस्ट केला आहे. अनेकांनी कमेंट करत सानियाच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे.
