AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुख खानने ‘या’ क्रिकेटरला म्हटलं बॉलिवूडचा ‘जावई’

2023 या वर्षांत शाहरुखचे तीन मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. 'जवान', 'पठाण', 'डंकी' या तिन्ही चित्रपटांनी मिळून जगभरात तब्बल 2500 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. हे तिन्ही चित्रपट शाहरुखच्या करिअरमधील हिट चित्रपट ठरले. जवळपास चार वर्षांच्या ब्रेकनंतर त्याने पुनरागमन केलं होतं.

शाहरुख खानने 'या' क्रिकेटरला म्हटलं बॉलिवूडचा 'जावई'
Shah Rukh KhanImage Credit source: Instagram
| Updated on: May 01, 2024 | 10:04 AM
Share

बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खानने आजवर अनेक अभिनेत्रींसोबत काम केलंय. मात्र इंडस्ट्रीतल्या एका अभिनेत्रीच्या पतीला तो बॉलिवूडचा ‘जावई’ मानतो. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अनुष्का शर्मा आहे. अनुष्काने शाहरुखच्याच ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर जब तर है जान आणि झिरो यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो अनुष्काचा पती आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहलीबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. विराटसोबत मी बराच वेळ घालवला आहे, कारण तो अनुष्काला भेटायला सतत सेटवर यायचा, असं त्याने सांगितलं आहे. त्यामुळे जेव्हापासून अनुष्का आणि विराट एकमेकांना डेट करत आहेत, तेव्हापासून शाहरुख त्याला चांगल्याप्रकारे ओळखतो.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना शाहरुख पुढे म्हणाला, “मी त्याच्यासोबत खूप वेळ घालवला आहे. मला तो खूप आवडतो. आम्ही त्याला बॉलिवूडचा जावई म्हणतो. इतर खेळाडूंपेक्षा मी विराटला सर्वाधिक ओळखतो. मी विराट आणि अनुष्का या दोघांनाही बऱ्याच काळापासून ओळखतो आणि त्यांच्यासोबत मी बराच वेळ घालवला आहे. जेव्हापासून तो अनुष्काला डेट करत होता, तेव्हापासून मी त्याला ओळखतोय. त्यावेळी मी अनुष्कासोबत चित्रपटाचं शूटिंग करत होतो आणि तो तिला भेटायला सेटवर यायचा. त्यामुळे आमच्यात मैत्रीपूर्ण नातं निर्माण झालंय.”

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

गेल्या वर्षी आयपीएलदरम्यान शाहरुख खान आणि विराट यांनी एकत्र डान्ससुद्धा केला होता. शाहरुखच्या ‘पठाण’ या चित्रपटातील ‘झुमे जो पठान’ या गाण्याचा ‘हुक स्टेप’ दोघांनी मिळून केला होता. याविषयी शाहरुखने सांगितलं की त्याने विराटला रवींद्र जडेजासोबत ती स्टेप करताना पाहिलं होतं. मात्र दोघांना ती स्टेप जमत नव्हती, म्हणून शाहरुखने त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला. “माझ्या पठाण या चित्रपटातील एका गाण्याची स्टेप मी त्याला शिकवली होती. एका मॅचमध्ये मी त्याला रवींद्र जडेजासोबत ती स्टेप करताना पाहिलं होतं. दोघंही ती स्टेप करण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांना ते जमलं नाही. अखेर मी त्यांना ती स्टेप शिकवली होती”, असं किंग खानने सांगितलं.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.