शाहरुख खानच्या प्रकृतीविषयी मॅनेजरकडून अपडेट्स; उष्माघातामुळे रुग्णालयात दाखल

अभिनेता शाहरुख खानला उष्माघाताचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या प्रकृतीविषयी मॅनेजर पूजा ददलानीने महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. अहमदाबादमधील के. डी. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

शाहरुख खानच्या प्रकृतीविषयी मॅनेजरकडून अपडेट्स; उष्माघातामुळे रुग्णालयात दाखल
Shah Rukh Khan Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 23, 2024 | 4:19 PM

अभिनेता शाहरुख खानच्या प्रकृतीविषयी त्याची मॅनेजर पूजा ददलानीने माहिती दिली आहे. शाहरुखला उष्माघाताचा त्रास झाल्याने अहमदाबादमधील के. डी. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंगळवारी कोलकाता नाइट रायडर्स आणि सनराइझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल सामन्यादरम्यान त्याला उष्माघाताचा त्रास जाणवला होता. केकेआर आणि सनराइझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल 2024 मधील पहिला प्लेऑफ सामना होता. म्हणूनच शाहरुख खान त्याच्या टीमला पाठिंबा देण्यासाठी अहमदाबादला पोहोचला होता. आता शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीने ट्विट करत त्याच्या प्रकृतीविषयीचे अपडेट्स दिले आहेत.

पूजाने ट्विटरवर लिहिलं, ‘मिस्टर खान यांच्या सर्व चाहत्यांना आणि शुभचिंतकांना मी सांगू इच्छिते की ते आता ठीक आहेत. तुमच्या प्रेमासाठी, प्रार्थनांसाठी आणि काळजीसाठी धन्यवाद.’ उष्णतेच्या लाटेमुळे शाहरुखची तब्येत बिघडल्याने सध्याच्या हवामानात काळजी घेण्याचं महत्त्व पुन्हा अधोरेखित झालं आहे. शाहरुखला रुग्णालयात दाखल करताच त्याची पत्नी गौरी खान 22 मे रोजी अहमदाबादला पोहोचली. यानंतर कोलकाता नाइट रायडर्सची सहमालक आणि अभिनेत्री जुही चावलासुद्धा तिच्या पतीसह रुग्णालयात शाहरुखच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पोहोचली.

हे सुद्धा वाचा

मंगळवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर KKR आणि SRH यांच्यात मॅच झाली. त्यावेळी शाहरुख खान हा त्याची मुलं सुहाना, अबराम आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी यांच्यासोबत मॅच पाहण्यासाठी उपस्थित होता. त्याचवेळी त्याला उष्माघाताचा त्रास झाला. त्यानंतर त्याला तातडीने के.डी. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. याबाबत जुही चावलाने सांगितलं, “मंगळवारी रात्रीपासूनच त्याची तब्येत बरी नव्हती. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. आधीपेक्षा तो आता बरं आहे. देवाच्या कृपेने तो लवकर बरा होईल. आयपीएलच्या अंतिम सामन्यात तो स्टेडियममध्ये उपस्थित राहून त्याच्या संघाला सपोर्ट करेल.”

गेल्या दोन दिवसांपासून शाहरुख हा अहमदाबादमध्येच होता. प्रचंड ऊन असल्यामुळे त्याला डिहायड्रेशनचा त्रास झाला. केकेआरची मॅच संपल्यानंतर शाहरुख खान बराच वेळ मैदानात होता आणि चाहत्यांचे आभार मानत होता. त्यानंतर रात्री तो टीमसोबत अहमदाबादमधील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये पोहोचला. मात्र 22 मे रोजी सकाळी शाहरुखची तब्येत बिघडली. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Non Stop LIVE Update
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.