शाहरुख खान साकारणार साहिर लुधियानवींची व्यक्तिरेखा?; नव्या सिनेमाबाबत चर्चांना उधाण

प्रसिद्ध शायर साहिर लुधियानवी यांच्या बायोपिकची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे.

शाहरुख खान साकारणार साहिर लुधियानवींची व्यक्तिरेखा?; नव्या सिनेमाबाबत चर्चांना उधाण

मुंबई : प्रसिद्ध शायर साहिर लुधियानवी यांच्या बायोपिकची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. मागीपाठच्या 8 वर्षांपासून ही चर्चा सुरु आहे मात्र अद्यापही साहिर यांच्या आयुष्यावरील बायोपिक चित्रित झालेला नाही. मात्र आता लव्हगुरु शाहरुख खान साहीर लुधियानवी यांची भूमिका साकारणार असून लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जातीये. (Shah Rukh Khan May be Play lead Role in Sahir Ludhianvi biopic)

साहिर यांच्यावरील चित्रपटाची जेव्हा चर्चा सुरु झाली होती तेव्हा त्यांच्यावरील चित्रपट संजय लीला भन्साळी बनवतील आणि साहिर यांची भूमिका अभिषेक बच्चन साकारतील, अशी चर्चा होती. मात्र आता शाहरुख की रेड चिलीज कंपनी त्यांच्यावर चित्रपट बनविणार असल्याची माहिती मिळतीये. शाहरुख खानच साहिर यांची व्यक्तीरेखा साकारेल, हे आणखी नक्की झालेलं नाही.

दुसरा अभिनेताही त्यांची व्यक्तीरेखा साकारु शकतो. साहिर यांच्यावर चित्रपट यावा यासाठी लेखिका जसमीत रीन पाठीमागच्या काही वर्षापासून संघर्ष करीत आहे. भन्साळी यांच्या अगोदर आशी दुआ या साहिर यांच्यावरील चित्रपट प्रोड्युस करणार होत्या. साहिर यांच्यावरील प्रसंग वेगवेगळ्या वेळी दाखवण्यासाठी फरहान अख्तर, इरफान आणि अभिषेक बच्चन यांची निवड केल्याचीही चर्चा होती.

परंतु ही चर्चा प्रत्यक्षात आलेली नाही. ती केवळ चर्चाच बनून राहिली.या फिल्ममध्ये अमृता प्रीतम यांच्या रोलसाठी प्रियांचा चोप्रा, करीना कपूर आणि तापसी पन्नू यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. अमृता यांचं साहिर यांच्यावर खरोखर खूप जास्त प्रेम होतं. साहिर यांच्या प्रेमात अमृता पूर्ण बुडून गेल्या होत्या. जसमीत रीन यांनी अद्याप तरी या फिल्मबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु 8 मार्च 2021 ला साहिर यांची 100 वी जयंती आहे. याच जयंतीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावरील चित्रपटाची मोठी घोषणा होऊ शकते, असा अंदाज लावला जातोय

संबंधित बातम्या : 

शाहिद कपूरऐवजी मीराचा दुसर्‍या व्यक्तीसोबत व्हॅलेंटाईन डे जल्लोषात!

आमिरच्या लेकीचा रोमँटिक व्हॅलेंटाईन, बॉयफ्रेंडसोबत शेअर केला खास व्हिडिओ!

Karnan | ‘कर्णन’चा फर्स्ट लूक आला; धनुषकडून चित्रपटाची तारीख जाहीर!

(Shah Rukh Khan May be Play lead Role in Sahir Ludhianvi biopic)

Published On - 6:38 pm, Sun, 14 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI