चित्रपटगृहात कुटुंबासोबत पाहू शकतो पठाण ? खुद्द किंग खान याने दिलं प्रश्नाचं उत्तर

श्वेता वाळंज,  Tv9 मराठी

Updated on: Jan 25, 2023 | 10:13 AM

अनेक सिनेमे चित्रपटगृहात कुटुंबासोबत पाहाता येत नाही; शाहरुख खान स्टारर पठाण सिनेमा कुटुंबासोबत पाहाता येईल? खुद्द किंग खान याने दिलं उत्तर

चित्रपटगृहात कुटुंबासोबत पाहू शकतो पठाण ? खुद्द किंग खान याने दिलं प्रश्नाचं उत्तर
चित्रपटगृहात कुटुंबासोबत पाहू शकतो पठाण ? खुद्द किंग खान याने दिलं प्रश्नाचं उत्तर

Shah Rukh Khan gives Pathaan Review on Twitter : अभिनेता शाहरुख खान , जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर ‘पठाण’ सिनेमामा २५ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. चार वर्षांनंतर किंग खान मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सिनेमाच्या प्रमोशन्सनंतर चाहत्यांमध्ये पठाणबद्दल क्रेझ दिसून येत आहे. पण कुटुंबासोबत सिनेमा पाहाता येणार की नाही? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहे. एवढंच नाही तर, सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक आधी रिव्हू जाणून घेतात आणि त्यानंतर कुटुंबासाठी तिकीट बूक करतात.

पठाण सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी मोठ्या अडचणीत अडकला होता. ‘बेशर्म रंग’ गाण्यातील दीपिका पादुकोण हिने घातलेल्या भगव्या बिकीनीमुळे सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला. म्हणून सिनेमा कुटुंबासोबत चित्रपटगृहात पाहाता येणार की नाही? असा प्रश्न चाहते विचारत होते. चाहत्यांच्या या प्रश्नाचं उत्तर खु्द्द किंग खान याने ट्विटरच्या माध्यमातून दिलं आहे.

‘आस्क एसआरके’ (Ask SRK) सेशनदरम्यान एका चाहत्याने शाहरुख खान याला विचारलं. ‘तुझा सिनेमा कुटुंबासोबत पाहण्यासारखा आहे की नाही?’ चाहत्यांच्या या प्रश्नावर किंग खान याने दिलेलं उत्तर सध्या तुफान चर्चेत आहे. या प्रश्नाचं उत्तर देत शाहरुख म्हणाला, ‘मी माझ्या कुटुंबासोबत सिनेमा पाहिला आहे. त्यामुळे तुम्ही देखील पाहायला हरकत नाही.’ असं उत्तर किंग खान याने दिलं.

सध्या सर्वत्र पठाण सिनेमाची चर्चा आहे. शाहरुख याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये अभिनय करत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता शाहरुख तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. म्हणून अभिनेत्याला रुपेरी पडद्यावर पुन्हा पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

शाहरुख खान चार वर्षांनी पदार्पण करणार असल्यामुळे सिनेमागृहांबाहेर प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा लागणार आहेत. सांगायचं झालं तर, पठाण बुधवारी प्रदर्शित होणार आहे. सिनेमाने प्रदर्शनापूर्वीच जवळपास ५० कोटी रुपयांच्या ॲडव्हान्स तिकीटांची विक्री केली आहे. रिपोर्टुनुसार आतापर्यंत पठाण सिनेमाचे जवळपास १३ लाख तिकीटांची विक्री झाली आहे

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI