Suhana Khan | बॉयफ्रेंडने फसवणूक केल्यानंतर काय करेल किंग खान याची लेक? सुहाना म्हणाली…
Suhana Khan | शाहरुख खान याची लेक सुहानाची रिलेशनशिपमध्ये फसवणूक करणाऱ्याला मोजावी लागेल मोठी किंमत... सुहाना हिने केलेलं वक्तव्य थक्क करणारं...

मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : अभिनेता शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान देखील वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुहाना खान हिच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल मोठी चर्चा रंगत आहे. सुहाना लवकरच ‘द आर्चीज’ (The Archies) सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘द आर्चीज’ सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून प्रेक्षक देखील सुहाना हिला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. एवढंच नाही तर, सुहाना हिच्या खासगी आयुष्याबद्दल देखील अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
सध्या सुहाना तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सुहाना हिला एक प्रश्न विचारण्यात आला, ‘जर सुहाना हिच्या बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुली आवडत असतील तर तू काय करशील?’ असा खासगी प्रश्न किंग खान याच्या लेकीला विचारण्यात आला. याचं उत्तर देत सुहानाने मोठं वक्तव्य केलं आहे. (suhana khan boyfriend)
सुरुवातीला, सुहानाने सिनेमातील वेरोनिकाच्या भूमिकेच्या दृष्टिकोनातून उत्तर दिलं. वेरोनिकाला अप्रोच करणाऱ्या मुलींची लिस्ट फार मोठी आहे. ती देखील दुसऱ्या मुलांसोबत बोलू शकते.. त्यानंतर खऱ्या आयुष्यात बॉयफ्रेंडने फसवणूक केल्यानंतर मोठा निर्णय घेईल असं देखील सुहाना म्हणाली. सध्या सर्वत्र सुहाना खान हिच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.
सुहाना म्हणाली, ‘माझ्या बॉयफ्रेंडने माझी फसवणूक केली तर मी त्याला सोडून देईल… ‘वन वुमन मॅन’ अशा विचारांचे पुरुष मला आवडतात. अनेक मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये राहणार नाही…’ सध्या सर्वत्र सुहाना खान हिने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.
सुहाना हिच्यासोबत ‘द आर्चीज’ सिनेमात दिसणार आणखी स्टारकिड्स
सुहाना हिच्यासोबत ‘द आर्चीज’ सिनेमात महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्या नंदा, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर, मिहिर आहुजा, वेदांग रैना, आदिती डॉट आणि युवराज मेंडा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा सुरु असून सिनेमा ७ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
‘द अर्चिस’ सिनेमानंतर सुहाना बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याच्या सिनेमात देखील झळकणार असल्याची चर्चा रंगत आहे. काही दिवसांपूर्वी सुहाना करण जोहर याच्या सिनेमात भूमिका साकारणार असल्याची चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.