सोनम कपूरची बहिण सोने व्यावसायिकाच्या प्रेमात वेडी; लवकरच करणार बॉलिवूड एन्ट्री
अभिनेत्री सोनम कपूरची बॉलिवूडमध्ये एक खास ओळखं आहे. आता तिची बहिण फिल्म इंडस्ट्रीत आपलं नशीब आजमवण्यासाठी सज्ज आहे. तसेच ती तिच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे.

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांचे मुलं-मुली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तर काहीजण आता आगामी चित्रपटांद्वारे किंवा सीरिजद्वारे फिल्मी इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री घेत आहेत. या स्टारकिड्सपैकी एक आहे सोनम कपूर जीने बॉलिवूडमध्ये आपली एक खास ओळख बनवली आहे.एवढंच नाही तर तिला फॅशन आयकॉन मानलं जातं. मात्र बाळ झाल्यानंतर सोनम आता चित्रपटांमध्ये फार सक्रिय नाही आहे. पण ती इव्हेंट्समध्ये, शोमध्ये सहभागी होताना दिसते.
सोनमची ही बहिण बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार
दरम्यान सोनम कपूरप्रमाणे तिच्या भावाने देखील बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला अपेक्षित असं यश मिळालं नाही. आता सोनम कपूरची बहिण आता बॉलिवूडमध्ये आता आपलं नशीब आजमवण्यासाठी सज्ज आहे. सोनमची ही बहिण म्हणजे शनाया कपूर. जी संजय कपूरची मुलगी आहे. शनाया नात्याने सोनम कपूरची चुलत बहिण आहे.
सोन्याच्या व्यावसायिकाला करतेय डेट
शनाया कपूर ‘तू या मैं’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चाहते शनायाच्या पदार्पणाची आतुरतेने वाट पाहत आहेत.मात्र संजय कपूरची मुलगी तिच्या बॉलिवूड पदार्पणापूर्वीच चर्चेत आली आहे.शनाया तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.शनाया एका सोन्याच्या व्यावसायिकाला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. ज्याबद्दल ती हळूहळू सोशल मीडियावर चाहत्यांना माहिती देत आहे. शनायाच्या चित्रपटांसोबतच चाहत्यांना तिच्या लव्ह लाईफबद्दलही जाणून घ्यायचे आहे. शनाया उद्योगपती करण कोठारीला डेट करत आहे. शनायाने नुकतीच तिच्या पदार्पणाच्या चित्रपटाची घोषणा केली. ज्या पोस्टवर करणने कमेंट केली.
View this post on Instagram
दोघेही कॉलेज फ्रेंड्स
करणने लिहिले आहे की, “तू वर्षानुवर्षे जे स्वप्न पाहत आहात ते पूर्ण करण्याची वेळ आली आहे. ती आता तिचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे. करणच्या या कमेंटनंतर दोघे एकत्र असल्याच्या बातम्यांना खात्री दिली गेली आहे. करण आणि शनाया यांनी एकत्र शिक्षण घेतले आहे. दोघेही एकाच कॉलेजमध्ये होते. करण त्याच्या वडिलांसोबत सोन्याचा व्यवसाय करतो.
शनायाच्या कामाबद्दल…
शनायाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास शनायाने आतापर्यंत अनेक चित्रपट साइन केले आहेत. शनाया कपूरने करणच्या गोल्ड ब्रँडसाठी फोटोशूटही केले. ते फोटो तिचे खूप व्हायरलही होत आहेत. शनाया ‘आँखों के गुस्ताखिया’ मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात शनायासोबत विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शनाया कपूरने अलीकडेच चित्रपटाच्या सेटवरून विक्रांत मेस्सीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
