AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्जरीनंतर दीपिकाला पुन्हा होऊ शकतो कॅन्सर; पतीने व्यक्त केली भीती, म्हणाला ‘दर 3 आठवड्यांनी..’

अभिनेत्री दीपिका कक्करवर काही दिवसांपूर्वी स्टेज 2 लिव्हर कॅन्सरवरील सर्जरी करण्यात आली होती. परंतु या सर्जरीनंतरही दीपिकाला पुन्हा कॅन्सर होऊ शकतो, अशी चिंती पती शोएबने व्यक्त केली आहे. सध्या दीपिकाच्या शरीरात कॅन्सरच्या पेशी नाहीत.

सर्जरीनंतर दीपिकाला पुन्हा होऊ शकतो कॅन्सर; पतीने व्यक्त केली भीती, म्हणाला 'दर 3 आठवड्यांनी..'
Dipika Kakar and Shoaib IbrahimImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 06, 2025 | 10:38 AM
Share

‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्करला स्टेज 2 लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर तिच्यावर सर्जरी करण्यात आली. दीपिकाच्या प्रकृतीविषयी तिचा पती आणि अभिनेता शोएब इब्राहिम सतत व्लॉगच्या माध्यमातून अपडेट देतोय. नुकत्याच एका व्लॉगमध्ये शोएबने आता दीपिकाच्या पुढील ट्रीटमेंटविषयी सविस्तर माहिती दिली. शोएबने सांगितलं की दीपिकाच्या शरीरात सध्या कर्करोगाच्या पेशी नाहीत. परंतु ट्युमरला ‘ग्रेड थ्री’ म्हणून वर्गीकृत केल्याने तो खूपच आक्रमक होता, असं त्याने म्हटलंय. त्यामुळे दीपिकाला पुन्हा ट्युमर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

“आधी आम्हाला वाटलं होतं की जर ट्युमर काढून टाकला, तर सर्वकाही ठीक होईल. सध्या तरी तिच्या शरीरात कॅन्सरच्या पेशी नाहीत. परंतु आम्हाला मिळालेल्या बायोप्सी रिपोर्ट आणि आम्ही तपासलेल्या पीईटी स्कॅनमध्ये अधिक गंभीर परिस्थिती असल्याचं दिसून आलं. ट्युमरला ग्रेड थ्री म्हणून वर्गीकृत करण्यात आलं होतं आणि तो खूप कमी प्रमाणात दिसून येतो. याचा अर्थ तो खूपच आक्रमक होता. त्यामुळे तो पुन्हा होण्याची शक्यता अधिक असते”, असं सांगत शोएबने चिंता व्यक्त केली.

View this post on Instagram

A post shared by Dipika (@ms.dipika)

यापुढे त्याने दीपिकाच्या ट्रीटमेंटविषयीची माहिती दिली. लिव्हर कॅन्सरवर दोन प्रकारचे ट्रिटमेंट्स करता येऊ शकतात. त्यापैकी एक इम्युनोथेरपी (आयव्ही ड्रीपद्वारे) आणि दुसरी तोंडी गोळ्या-औषधं घेऊन असते. दीपिका गोळ्या घेऊन उपचाराची सुरुवात करणार असल्याचं शोएबने सांगितलं. याविषयी तो पुढे म्हणाला, “सर्जरीनंतर डॉक्टरांनी काही औषधं दिली आहेत. सध्या जरी कॅन्सरच्या पेशी नसल्या तरी, भविष्यात त्या पेशी आढळल्यास, औषधांचा डोस वाढवला जाऊ शकतो. हा उपचार पुढील एक-दीड किंवा दोन वर्षांपर्यंत चालू शकतो. दर तीन आठवड्यांनी स्कॅन्स केले जातील.”

कॅन्सरचं निदान झाल्यानंतर शोएब आणि दीपिकाने त्यांच्या युट्यूब चॅनलवर एक व्लॉग पोस्ट केला होता. त्यामध्ये ती म्हणाली होती, “कॅन्सर हा शब्द प्रत्येकासाठी खूप भीतीदायक, घाबरवणारा असतो. हा आजार मानसिकदृष्ट्या खूप घाबरवतो. परंतु डॉक्टरांनी सांगितलं आहे की मी पूर्णपणे बरी होऊ शकते.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.