Shraddha Murder Case: ‘ही’ सीरिज पाहून आफताबने केली होती श्रद्धाच्या निर्घृण हत्येची प्लॅनिंग?

'त्या' वेब सीरिजमध्ये असं काय होतं? जे पाहून आफताबने केला श्रद्धाच्या हत्येचा प्लॅन

Shraddha Murder Case: 'ही' सीरिज पाहून आफताबने केली होती श्रद्धाच्या निर्घृण हत्येची प्लॅनिंग?
'ही' सीरिज पाहून आफताबने केली होती श्रद्धाच्या निर्घृण हत्येची प्लॅनिंग? Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 16, 2022 | 8:37 AM

दिल्ली- दिल्लीतील श्रद्धा मर्डर केसमुळे संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. 27 वर्षांच्या श्रद्धा वॉकरची तिच्या प्रियकरानेच निर्घृण हत्या केली. आरोपी आफताब पूनावाला याने श्रद्धाच्या शरीराचे 35 तुकडे करत ते जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. दिल्ली पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे. या तपासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. ज्याप्रकारे आफताबने त्याच्या प्रेयसीची हत्या केली आणि तिच्या शरीराचे तुकडे जंगलात फेकले, हे ऐकून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.

रिपोर्ट्सनुसार, आफताबने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं की त्याने वेब सीरिज पाहून श्रद्धाच्या हत्येची प्लॅनिंग केली. प्रसिद्ध अमेरिकन क्राइम सीरिज ‘डेक्स्टर’चं (Dexter) त्याने नाव घेतलं. डेक्स्टर मॉर्गनवर (मायकल सी. हॉल) आधारित ही सीरिज मियामी मेट्रो पोलीस विभागाची एक काल्पनिक कथा आहे. हत्येच्या पॅटर्नचं विश्लेषण करणाऱ्या या सीरिजमध्ये सीरिअल किलरचं आयुष्य दाखवलं आहे.

डेक्स्टर या वेब सीरिजमधील मुख्य नायक डेक्स्टर मॉर्गन हा मियामी मेट्रो पोलीस विभागात फॉरेन्सिक टेक्निशियन म्हणून काम करत असतो. दिवसा तो गुन्ह्यांचा तपास करायचा, मात्र रात्री सीरिअल किलर बनून तो लोकांची हत्या करायचा. न्यायव्यवस्था गुन्हेगारांना पुरेशी शिक्षा देत नाही, म्हणून तो स्वत:च गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना शिक्षा देतो.

हे सुद्धा वाचा

या सीरिजच्या पहिल्या सिझनमध्ये डेक्स्टर हा हत्येनंतर शरीराचे तुकडे करून ते कचऱ्याच्या पिशवीत भरायचा. त्या पिशव्यांचं वजन वाढवण्यासाठी तो त्यात दगडी भरून सील करायचा. नंतर याच पिशव्या तो समुद्रात फेकायचा.

आफताबने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं की त्याला फक्त श्रद्धाचं तोंड बंद करायचं होतं. मात्र मारहाणीत त्याने तिचा गळाच दाबला. श्रद्धाच्या मृतदेहाला ठेवण्यासाठी त्याने नवीन फ्रीजसुद्धा खरेदी केला होता. तिच्या शरीराच्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी तो पुढील दोन-तीन महिने मेहरौलीच्या जंगलात फिरत होता.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.