AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्यावर अत्याचार होत असताना माझी लेक…., 2 घटस्फोटांनंतर श्वेता तिवारी व्यक्त झालीच

Shweta Tiwari : अभिनेत्री श्वेता तिवारी कायम खासगी आयुष्यामुळे असते चर्चेत, पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न, पण नाही मिळालं वैवाहिक आयुष्याचं सुख... आज दोन मुलांचा सिंगल मदर म्हणून करतेय सांभाळ...

माझ्यावर अत्याचार होत असताना माझी लेक...., 2 घटस्फोटांनंतर श्वेता तिवारी व्यक्त झालीच
| Updated on: May 18, 2024 | 2:43 PM
Share

‘कसोटी जिंदगी की’ मालिकेमुळे अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. श्वेताने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण खासगी आयुष्यात अभिननेत्रीला अनेक संकटांचा सामना करावा लागला. दोन वेळा घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्री ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करत आहे. श्वेता हिचं पहिलं लग्न वयाच्या वयाच्या 18 व्या वर्षी राजा चौधरी याच्यासोबत झालं. दोघांना एक मुलगी आहे. मुलीचं नाव पलक तिवारी असं आहे.

पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर अभिनेत्रीने दुसरं केलं. श्वेताच्या दुसऱ्या पतीचं नाव अभिनव कोहली असं आहे. दोघांना एक मुलगा असून त्याचं नाव रेयांश आहे. घटस्फोटानंतर अभिनेत्री दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. अनेकदा अभिनेत्री खासगी आयुष्यात घडलेल्या घटना देखील चाहत्यांना सांगितल्या आहे. एका जुन्या मुलाखतीत श्वेता हिने तिच्यावर झालेले अत्याचार आणि आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्यासोबत जे काही झालं ते सर्व पाहिल्यानंतर माझ्या मुलांना काय वाटलं असेल. त्यांच्या मनावर काय परिणाम झाले असतील. माझी लेक पलक हिने माझ्यावर झालेले अत्याचार पाहिले आहेत. माझ्या दोन्ही मुलांना स्वतःचे दुःख लपण्याची सवय आहे. ते दुःखी आहेत असं त्यांनी मला कधीच दाखवलं नाही…’

‘मला बिलकूल कळत नव्हतं, त्यांच्या भोवती एवढं सगळ होत आहे. तरी देखील दोघे आनंदी कसं राहातात. पलक हिने मला मारहाण होताना पाहिलं आहे. तेव्हा ती फक्त 6 वर्षांची होती. तेव्हा मी मोठं पाऊल उचल्याचा निर्णय घेतला… ‘ असं खुद्द श्वेताने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

श्वेता आता दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी हिने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. पलक तिवारी देखील आईसारखीच प्रचंड सुंदर दिसते. चाहते देखील पलक हिच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात.

श्वेता सोशल मीडियावर देखील मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. वयाच्या 43 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. अभिनेत्री आजही चाहत्यांनी फॅशन गोल्स देत असते. श्वेता कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.