सोहेल खानमुळे कठीण झालं होतं पूर्व पत्नीचं आयुष्य, सीमा 3 वर्षांनंतर म्हणाली…
'प्रत्येक गोष्टीसाठी जोडीदाराला दोष देणं म्हणजे...', सोहेल खान याच्यासोबत कठीण झालं होतं पूर्व पत्नीचं आयुष्य, 3 वर्षांनंतर सीमाने केलाय मोठा खुलासा, सध्या सर्वत्र सोहेल खान आणि सीमा सजदेह यांच्या नात्याची चर्चा...

अभिनेता सलमान खान वयात्या 58 व्या वर्षी देखील सिंगल आहे आणि पुढे देखील अविवाहित राहिल… असं खुद्द अभिनेत्याने स्पष्ट केलं. पण सलमान खानचे भाऊ कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. अरबाज खान याने अभिनेत्रीला मलायका अरोरा हिला घटस्फोट दिला आणि वयाच्या 56 व्या वर्षी शुरा खान हिच्यासोबत दुसरा संसार थाटला. तर अभिनेता सोहेल खान याने देखील पत्नीला घटस्फोट दिला आहे. सोहेल खान याच्या पत्नीचं नाव सीमा सजदेह असं आहे. दरम्यान, सीमा हिने घटस्फोटाच्या 3 वर्षांनंतर सोहेल सोबत असलेल्या नात्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सीमा हिने घटस्फोटावर स्वतःचे विचार सांगितले आहेत एवढंच नाही तर, आयुष्यात प्रगती करण्यााठी कोणत्या गोष्टीने अधिक प्रेरित केलं याबद्दल देखील अभिनेत्रीने सांगितलं आहे. ‘लग्न झाल्यानंतर कोणत्याच गोष्टीची अधिक विचार न करणं आणि प्रत्येक गोष्टीत समोरच्याला दोषी ठरवणं फार सोपं असतं….’
लग्नानंतर सीमा पूर्णपणे सोहेल खान याच्यावर अवलंबून होती. घटस्फोटानंतर तिला स्वतःच्या अनेक गोष्टी सावरुन घ्याव्या लागल्या. शस्त्रक्रिया झाल्यानंतर देखील सीमाला हेल्थ इंश्योरेन्स संबंधी अनेक गोष्टी एकटीला कराव्या लागल्या. अचानक आयुष्यात आलेल्या प्रसंगांमुळे सीमा आत्मनिर्भर झाली. शिवाय तिने स्वतःला देखील सावरलं आणि नव्या आयुष्याला सुरुवात केली.
आता सीमा एकटी हॉटेलमध्ये जातो, एकटी प्रवास करते आणि स्वतःला रोज नव्या दृष्टीने अनुभवत आहे. सीमा हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, सोहेल खान याला घटस्फोट दिल्यानंतर सीमा एक्स बॉयफ्रेंड विक्रम आहूजा याला डेट करत आहे. सोहेल सोबत लग्नाआधी सीमा आणि विक्रम यांचा घटस्फोट झाला होता.
सीमा सजदेह आणि सोहेल खान यांचं लग्न
सीमा सजदेह आणि सोहेल खान 1998 मध्ये लग्न केलं. पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या 24 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2022 मध्ये सोहेल आणि सीमा यांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली. सीमा सजदेह आणि सोहेल खान यांना दोन मुलं आहे. निर्वाण आणि योहान असं त्यांच्या दोन मुलांची नाव आहेत.