‘इतकी प्यायची तरी कशाला?’; सोहैल खानची एक्स-वाइफ ट्रोल, व्हिडीओ व्हायरल

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

Updated on: Nov 27, 2022 | 9:17 AM

करण जोहरच्या पार्टीनंतर सोहैल खानच्या पूर्व-पत्नीचा डगमगला तोल; फोनवर बोलता बोलताच..

'इतकी प्यायची तरी कशाला?'; सोहैल खानची एक्स-वाइफ ट्रोल, व्हिडीओ व्हायरल
Seema Sajdeh
Image Credit source: Instagram

मुंबई: निर्माता-दिग्दर्शक करण जोहर हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील मोठमोठ्या पार्ट्यांसाठी खास ओळखला जातो. करण जोहरची पार्टी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. त्याच्या या पार्टीला इंडस्ट्रीतील बरेच कलाकार उपस्थित असतात. नुकतंच करणने त्याच्या राहत्या घरी एका मोठ्या पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा, सोनम कपूर, अनन्या पांडे, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, शनाया कपूर, सोहैल खानची पूर्वाश्रमीची पत्नी आणि फॅशन डिझायनर सीमा सजदेह यांसह बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते. याच पार्टीतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

सोहैल खानची पूर्वाश्रमीची पत्नी सीमा सजदेहचा हा व्हिडीओ आहे. फोनवर बोलण्यासाठी सीमा करणच्या बाहेर गेटजवळ आली होती. त्याचवेळी पापाराझींनी तिचा व्हिडीओ शूट केला. मात्र याच व्हिडीओवरून सीमाला प्रचंड ट्रोल केलं जातंय.

पापाराझींसमोर सीमाचा तोल डगमगला आणि नंतर भिंतीचा आधार घेऊन ती उभी राहिल्याचं या व्हिडीओत पहायला मिळतंय. मात्र ज्याप्रकारे ती डगमगली आणि त्यानंतर तिचा बोलण्याचा अंदाज पाहून ‘ती खूप जास्त दारू प्यायली की काय’ असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

‘इतकी प्यायची तरी कशाला’ अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ‘हिला जास्तच दारू चढली आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘तिला धड उभंही राहता येत नाहीये’ असं दुसऱ्याने म्हटलंय.

काही महिन्यांपूर्वीच सीमा आणि सोहैल यांनी घटस्फोट घेतला. लग्नाच्या 24 वर्षांनंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या दोघांना निर्वाण आणि योहान ही दोन मुलं आहेत. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही दोघं वेगळे राहतोय, असं तिने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI