रामायणातील प्रश्नावरुन ट्रोल करणाऱ्यांना सोनाक्षीचे उत्तर

रामयणावरुन प्रश्नांचे उत्तर न दिल्यामुळे ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्संना अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi sinha answer to troller) उत्तर दिले आहे.

रामायणातील प्रश्नावरुन ट्रोल करणाऱ्यांना सोनाक्षीचे उत्तर

मुंबई : रामयणावरुन प्रश्नांचे उत्तर न दिल्यामुळे ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्संना अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi sinha answer to troller) उत्तर दिले आहे. मला पायथागोरसची थिअरी, मुगलांची वंशावळ आणि अजून इतर काही सध्या आठवत नाही, जर तुमच्याकडे काही काम नसेल तर यावरही मीम्स बनवा, असं उत्तर सोनाक्षीने ट्वीट करत दिले आहे. नुकतेच सोनाक्षीने ‘कौन बनेगा करोडपती’च्या 11 व्या (Kaun Banega Crorepati 11) सीझनमध्ये हजेरी लावली. त्यावेळी तिला रामायणाबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर सोनाक्षी देऊ शकली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर सोनाक्षीला ट्रोल करण्यात येत आहे.

“प्रिय जागे झालेले ट्रोलर्स, मला पायथागोरस थिअरी, मर्चेंट ऑफ वेनिस, पीरियोडिक टेबल, मुगलांची वंशावळ आणि अजून इतर काही सध्या आठवत नाही, जर तुमच्याकडे काही काम नसेल आणि खूप वेळ असेल तर कृपया यावरही सर्वांनी मीम्स बनवा. मला मीम्स खूप आवडतात”, असं सोनाक्षी सिन्हाने ट्वीट करत ट्रोलर्संना उत्तर (Sonakshi sinha answer to troller) दिलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

सोनाक्षी सिन्हा ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati 11) कार्यक्रमात आली होती. यावेळी ती राजस्थानच्या समाज सेविका रुमा देवी यांना मदत करण्यासाठी आली होती. कार्यक्रमाचे होस्ट अमिताभ बच्चन यांनी रामायणा संबंधित एक प्रश्न विचारला. पण या प्रश्नाचे उत्तर सोनाक्षी देऊ शकली नाही.

यानंतर तिने लाईफलाईनचा वापर करत या प्रश्नाचे उत्तर दिले. रामायणा संबधित उत्तर सोनाक्षीला माहित नसल्यामुळे अनेक प्रेक्षकांना धक्का बसला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोनाक्षीला ट्रोल करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे सोनाक्षी ज्या घरात राहते त्या घराचे नाव रामायण आहे. वडिलांचे नाव शत्रुघ्न सिन्हा, काकांचे नाव राम, लक्ष्मण आणि भारत आहे. सोनाक्षीच्या भावांचे नाव लव आणि कुश आहे. असे असतानाही तिने उत्तर न दिल्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *