AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हाच्या भावांबद्दल मोठा खुलासा, शत्रुघ्न सिन्हांच्या मुलांना…

अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची जुळी मुलं, लव आणि कुश, रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेतील लव-कुशच्या भूमिकेसाठी सुरुवातीला विचाराधीन होती. मात्र काही कारणांमुळे त्यांना ही संधी मिळाली नाही.

Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हाच्या भावांबद्दल मोठा खुलासा, शत्रुघ्न सिन्हांच्या मुलांना...
शत्रुघ्न सिन्हा- सोनाक्षी सिन्हाImage Credit source: social media
| Updated on: Dec 29, 2025 | 12:47 PM
Share

अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughna Sinha)  यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ही देखील चित्रपटसृष्टीत आली. गेल्या कित्येक वर्षांपासून मोठ्या पडद्यावर काम करणाऱ्या सोनाक्षी सिन्हा हिच्या चित्रपटांपेक्षा पर्सनल आयुष्याचीच जास्त चर्चल असते. जहीर इक्बाल सोबत आंतरधर्मीय लग्न केल्यावर तर तिच्याबद्दल बरंच काही बोललं गेलं, पण तिने टीकाकारांकडे लक्ष न देताच त्यांना गप्पं केलं. शत्रुघ्न सिन्हा यांना सोनाक्षी ही एक मुगी तर लव-कुश ही जुी मुलंही आहेत. सोनाक्षीच्या लग्नात त्यांच्या अनुपस्थितीची बरीच चर्चा झाली होती. तिचं लग्न त्यांना मान्य नव्हतं, अशाही बातम्या समोर आल्या होत्या. मात्र सिन्हा कुटुंबाने किंवा दोन्ही भावांपैकी कोणीच या विषयाला जास्त हवा दिली नाही.

दरम्यान आता याच लव आणि कुश सिन्हाबद्दल एका मोठा खुलासा झाला आहे. रामानंद सागर यांची ‘रामायण’ मालिका माहीत नाही असा माणूस विरळाच. त्यांची ही मालिका भारतीय टेलिव्हिजनमधील एक मैलाचा दगड ठरली होती, ज्याने प्रेक्षकांच्या हृदयावर अशी छाप सोडली की ती आजही कायम आहे. दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या या मालिकेने वाल्मिकी यांच्या रामायणावर आधारित कथा घराघरात पोहोचवली. अरुण गोविल (राम), दीपिका चिखलिया (सीता), सुनील लहरी (लक्ष्मण), आणि दारा सिंह (हनुमान) यांनी या मालिकेला अमर केलं, ज्याची आठवणही आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे. याच मालिकेशी निगडीत अनेक किस्से आहेत. त्यापैकूच एक मजेशीर किस्सा लव-कुश भूमिका साकाऱणाऱ्या बालकलाकांरांशी निगडीत आहे.

शत्रुघ्न सिन्हांच्या मुलांना मिळाली असती संधी

रामायणातील उत्तर कांडात लव आणि कुश ही पात्रं महत्त्वाची होती. रामानंद सागर यांनी सुरुवातीला अभिनेता-राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांच्या जुळ्या मुलांना (लव आणि कुश सिन्हा) या भूमिकांसाठी कास्ट करण्याचा विचार केला. मात्र अनेक कारणांमुळे हे शक्य झाले नाही. त्यानंतर करामानंद सागर यांनी दुसऱ्या बाल कलाकारांचा शोध सुरू केला आणि महाराष्ट्रातील दोन तरुण मुलांवर लक्ष केंद्रित केले. स्वप्नील जोशी (कुश म्हणून) आणि मयुरेश क्षेत्रमडे (लव्ह म्हणून) मालिकेत झळकले. त्यांच्या निरागस चेहऱ्यांनी आणि अभिनयाने सर्वाचं मन जिंकून घेतलं.

टॅक्सी ड्रायव्हरमुळे सापडले लव कुश

एका मुलाखतीत रामानंद सागर यांनी या बाल कलाकारांसोबत सेटवर घडलेल्या मजेदार घटना सांगितल्या. ते म्हणाले, “दिल्लीतील काही कलाकारांनी मला खूप छळलं. झालं असं की कानपूरला जाताना मला “लव कुश” असं लिहिलेली एक टॅक्सी दिसली. उत्सुकतेपोटी मी ड्रायव्हरला विचारलं,तेव्हा त्याने मला सांगितलं की ती त्याच्या बॉसच्या मुलांची नावे आहेत. मी त्या मुलांना ऑडिशनसाठी बोलावलं. ते लव आणि कुश या पात्रांच्या अगदी वयाचे होते. त्या ऑडिशनमध्ये पास झाल्यानंतर, रामानंद सागर यांना वालं की हे दोघे खोडकर आहेत, परंतु ते चांगले कलाकार देखील असतील. मात्र शूटिंग सुरू झाल्यावर अडचणी वाढल्या. सेटवर आल्यानंतर, दोघेही तयार होऊन बसायचे, पण कॅमेरा चालू होताच ते काम करण्यास नकार द्यायचे. त्यानंतर रामानंद सागर यांनी लव-कुश यांना या भूमिकेसाठी न घेता दुसऱ्या मुलांची ऑडिशन घेऊन त्यांना कास्ट केलं. अन्यथा शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुलीप्रमाणेच, त्यांची दोन मुलंही आज अभिनय क्षेत्रात दिसली असती

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?