AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रॅश डाएट की आणखी काही..; श्रीदेवी यांच्या निधनामागच्या कारणाबद्दल बोनी कपूर यांनी केलेला खुलासा

अभिनेत्री श्रीदेवी यांनी 24 फेब्रुवारी 2026 रोजी या जगाचा अखेरचा निरोप घेतला होता. त्यांच्या निधनाने सबंध सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला होता. त्यांचे पती बोनी कपूर हे एका मुलाखतीत निधनाच्या कारणाविषयी मोकळेपणे व्यक्त झाले होते.

क्रॅश डाएट की आणखी काही..; श्रीदेवी यांच्या निधनामागच्या कारणाबद्दल बोनी कपूर यांनी केलेला खुलासा
Sridevi and Boney KapoorImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 24, 2026 | 2:07 PM
Share

बॉलिवूडची ‘चांदनी’ अर्थात अभिनेत्री श्रीदेवी यांचं 24 फेब्रुवारी 2018 रोजी निधन झालं होतं. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली होती. श्रीदेवी यांचं निधन दुबईत झालं होतं. त्या एका लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी तिथे गेल्या होत्या. दुबईत त्या ज्या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या, त्याच हॉटेलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यांच्या निधनाच्या कारणाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. काही रिपोर्ट्सनुसार, श्रीदेवी त्यांच्या आगामी चित्रपटासाठी तयारी करत होत्या. त्यामुळे त्या त्यांच्या फिटनेसकडे अधिक लक्ष देत होत्या. परंतु त्यांना आधीपासूनच रक्तदाबाचा त्रास होता. डॉक्टरांनी त्यांना कोणत्याही प्रकारचा कठीण डाएट फॉलो करण्यास मनाई केली होती.

श्रीदेवी यांनी कठोर डाएटमुळे आपला जीव गमावला, अशीही चर्चा होती. श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांचे पती बोनी कपूर यांचीही पोलिसांनी चौकशी केली. काही वर्षांपूर्वी ‘द न्यू इंडियन’ला दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर यांनी यावर मोकळेपणे भाष्य केलं होतं. त्यात ते म्हणाले होते, “श्रीदेवी अत्यंत कठीण डाएट फॉलो करत होती, ज्यामध्ये ती मीठसुद्धा खात नव्हती. यामुळे कधी कधी तिला चक्करसुद्धा यायची. तो एक नैसर्गिक मृत्यू नव्हता, तर तो अपघाती मृत्यू होता. मी त्याबद्दल काहीच न बोलण्याचा निर्णय घेतला होता. कारण जेव्हा माझी चौकशी केली जात होती, तेव्हा जवळपास 24 ते 48 तासांपर्यंत मी त्याविषयी बोलत होतो.”

View this post on Instagram

A post shared by Boney.kapoor (@boney.kapoor)

“सुंदर दिसण्यासाठी ती अनेकदा उपाशीच राहायची. श्रीदेवीला कमी रक्तदाबाचा त्रास असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. आमच्या लग्नाच्या वेळीही तिला चक्कर आली होती. तिच्या जेवणात सहसा मीठच नसायचं. मी त्याकडे इतक्या गांभीर्याने कधी पाहिलं नव्हतं आणि ही गोष्ट इतकी गंभीर ठरू शकते, याचाही मी कधी विचार केला नव्हता. निधनाच्या संध्याकाळीही तिला गरगरल्यासारखं झालं होतं. त्यामुळे ती तिच्या रुममध्ये आराम करण्यासाठी गेली होती. त्यानंतर जेव्हा ती रुमवर परतली, तेव्हा तिने फ्रेश व्हायचं ठरवलं आणि बाथरुममध्ये गेली”, असं त्यांनी पुढे सांगितलं. श्रीदेवी यांचं निधन बाथटबमध्ये बुडून झाल्याचं अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटलं गेलं आहे.

Follow Us
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...