अभिनंदन यांचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी अभिनेत्रीची स्वराकडून शाळा

मुंबई : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे आज भारतात परतणार आहेत. संपूर्ण देश त्यांची वाट बघत आहे. वाघा बॉर्डरवर त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमलेली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने उत्तर देत पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर एअर स्ट्राईक केली. तेव्हापासून भारत-पाकिस्तानमधील तणाव हा वाढत चालला आहे. त्यातच सोशल मीडियावर भारत-पाकच्या नागरिकांमध्ये एक वेगळाचं …

अभिनंदन यांचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी अभिनेत्रीची स्वराकडून शाळा

मुंबई : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे आज भारतात परतणार आहेत. संपूर्ण देश त्यांची वाट बघत आहे. वाघा बॉर्डरवर त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमलेली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने उत्तर देत पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर एअर स्ट्राईक केली. तेव्हापासून भारत-पाकिस्तानमधील तणाव हा वाढत चालला आहे. त्यातच सोशल मीडियावर भारत-पाकच्या नागरिकांमध्ये एक वेगळाचं वाद सध्या सुरु आहे. इतकंच नाही तर भारतीय आणि पाकिस्तानी कलाकारांमध्येही तणाव वाढला आहे. यातच पाकिस्तानी अभिनेत्री विना मलिकने सोशल मीडियावर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेवर आक्षेप घेत एक निर्लज्ज पोस्ट केली. त्यावर भारतीय अभिनेत्री स्वरा भास्करने तिला चांगलेच खडे बोल सुनावले आहे.

भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा एक फोटो विनाने सोशल मीडियावर पोस्ट केला. हा फोटो पाकिस्तानी लष्कराने जारी केलेल्या पहिल्या व्हिडीओमधील आहे. यामध्ये विंग कमांडर अभिनंदन हे जखमी अवस्थेत दिसत आहेत. त्यांना पाक लष्कराच्या काही जवानांनी पकडून ठेवले आहे, त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली आहे. या फोटोसोबत विना मलिकने लिहिले की, “आत्ताच तर तुम्ही आला आहात…. चांगला पाहुणचार होणार तुमचा.”


भारतीय जवानाचा अपमान करणाऱ्या विनाच्या या पोस्टवर स्वरा भास्कर चांगलीच चिडली. तिने यावर विनाला खडे बोल सुणावले आणि तिच्या या अपमानास्पद वागणुकीवर टीकाही केली.

“विनाजी, तुम्हाला स्वत:वर आणि तुमच्या तुच्छ विचारांवर लाज वाटायला हवी. तुमचा उत्साह क्षणाचा आहे. आमचा जवान वीर आहे, त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आहे. कमीत कमी त्या मेजरमध्ये तरी विनम्रता होती जो विंग कमांडर अभिनंदन यांची चौकशी करत होता.”


पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारताकडून प्रत्यूत्तर म्हणून जैशच्या तळांचा विनाश यामुळे भारतीय आणि पाकिस्तानी कलाकारांवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. पाक कलाकारांवर भारतीय सिनेमांत काम करण्यास पूर्णपणे बंदी घातली जावी अशी मागणी होऊ लागली. तर अभिनेता सलमान खानने त्याच्या होम प्रॉडक्शनमध्ये बनलेल्या सिनेमातून पाक गायक आतिफ असलमचं गाणं काढून टाकलं. त्यामुळे भारत-पाकमधील तणाव हा आता दोन्ही देशांच्या कलाकारांमध्येही वाढतो आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *