AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KBC 12 | मुलींच्या शिक्षणासाठी स्वरूपा देशपांडे ‘हॉटसीट’वर, अमिताभ बच्चन यांच्याकडून स्कॉलरशिप जाहीर!

नुकत्याच पार पडलेल्या भागात नवी मुंबईच्या स्वरूपा देशपांडे (Swarupa Deshpande) यांना ‘हॉटसीट’वर बसण्याची संधी मिळाली होती.

KBC 12 | मुलींच्या शिक्षणासाठी स्वरूपा देशपांडे ‘हॉटसीट’वर, अमिताभ बच्चन यांच्याकडून स्कॉलरशिप जाहीर!
| Updated on: Oct 20, 2020 | 1:29 PM
Share

मुंबई : महानायकसमोर ‘केबीसी’च्या त्या मानाच्या खुर्चीत विराजमान व्हायला मिळावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. अनेक जण आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने या खेळत भाग घेतात. सध्या ‘केबीसी’चे 12वे पर्व (KBC 12) सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या भागात नवी मुंबईच्या स्वरूपा देशपांडे (Swarupa Deshpande) यांना ‘हॉटसीट’वर बसण्याची संधी मिळाली होती. मुलींच्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा उराशी बाळगून माऊली या स्पर्धेत सहभागी झाली होती. (Swarupa Deshpande from  Navi Mumbai wins 5 lakh scholarship for daughters education on KBC 12)

मुळच्या नागपूरच्या स्वरूपा देशपांडे, पतीपासून वेगळ्या झाल्यानंतर नवी मुंबईत स्थायिक झाल्या आहेत. पूर्वी रिसेप्शनिस्टची नोकरी करणाऱ्या स्वरूपा आता नवी मुंबईच्या एका दुकानात स्टोर इंचार्ज म्हणून काम करतात. आई आणि दोन लेकींची जबाबदारी खांद्यावर असताना, मुलींचे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.

फास्टेस्ट फिंगर जिंकत मानाच्या खुर्चीत विराजमान

गेल्या भागाच्या सुरुवातीस रेल्वे निरीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या सुभाष बिष्णोई यांना या खुर्चीत बसण्याचा बहुमान मिळाला होता. मात्र, चौथ्याच प्रश्नावर गडबडल्याने त्यांना रिकाम्या हातीच घरी परतावे लागले. यानंतर पार पडलेली ‘फास्टेस्ट फिंगर’ फेरी जिंकत स्वरूपा ‘केबीसी’च्या ‘हॉटसीट’वर विराजमान झाल्या. खेळासाठी त्यांनी मनोरंजन विश्वासंदर्भातल्या प्रश्नांना पसंती दर्शवली.

अमिताभ बच्चन यांनी पहिला प्रश्न ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपटाशी निगडीत प्रश्न विचारला. प्रश्न असा होता की, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेच्या शेवटच्या दृश्यात कोणत्या वाहनात चढण्यासाठी सिमरन राजचा हात धरते?’ याला उत्तरांचे पर्याय होते, ‘1.ट्राम, 2.बस, 3.ट्रक, 4.रेल’. एकाही क्षणाचा विलंब न लावता स्वरूपा यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले. (Swarupa Deshpande from  Navi Mumbai wins 5 lakh scholarship for daughters education on KBC 12)

‘अलिशा आणि रिने या दोन्ही मुलींची पालक कोणती अभिनेत्री आहे?’, असा दुसरा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. ज्याचे उत्तर होते सुश्मिता सेन. सुश्मिता सेनने या दोन मुलींना दत्तक घेत त्यांचे पालकत्व स्वीकारले आहे. स्वरूपा यांनी या प्रश्नाचेदेखील बरोबर उत्तर दिले.

मुलींच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप जाहीर

केबीसीत सहभागी होवून स्वरूपा जास्ती रक्कम जिंकू शकल्या नाहीत. ‘करसनभाई पटेल यांनी आपल्या मुलीच्या नावावर कोणता ब्रँड सुरू केला?’, या 3 लाख 20 हजाराच्या प्रश्नावर स्वरूपा अडखळल्या. या प्रश्नाचे उत्तर होते, ‘निरमा’. मात्र, त्यांनी या प्रश्नावर खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. केवळ 1 लाख 60 हजार इतकी रक्कम त्यांनी जिंकली. मात्र, खेळ सोडताना त्यांना एक सुखद धक्का मिळाला. अमिताभ बच्चन यांनी ‘वेदांतु’ची 5 लाखांची स्कॉलरशिप स्वरूपा यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी जाहीर केली. या घोषणेनंतर स्वरूपा देशपांडेंना आनंद गगनात मावेनासा झाला होता.

(Swarupa Deshpande from  Navi Mumbai wins 5 lakh scholarship for daughters education on KBC 12)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.