AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘प्रेमाची गोष्ट 2’मध्ये स्वप्निल जोशी – भाऊ कदम पहिल्यांदाच एकत्र, ट्रेलरने वाढवली उत्सुकता

चित्रपटात आजच्या काळातील प्रेमाचं वास्तव, त्यातील बदलती नाती, डिजिटल युगातील संवादाचे रूप आणि व्हीएफएक्स यांचा सुंदर मिलाफ यात आहे. आधुनिक तंत्रज्ञान, भावनांनी भरलेली कथा आणि सतीश राजवाडेंची खास प्रेमकथेची मांडणी या सगळ्यांचा अनोखा संगम ‘प्रेमाची गोष्ट 2’च्या ट्रेलरमधून दिसत आहे.

'प्रेमाची गोष्ट 2'मध्ये स्वप्निल जोशी - भाऊ कदम पहिल्यांदाच एकत्र, ट्रेलरने वाढवली उत्सुकता
Swapnil Joshi and Bhau KadamImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 19, 2025 | 3:26 PM
Share

दिवाळीच्या उत्साहात अधिक रंग भरायला सज्ज झालेला चित्रपट म्हणजे ‘प्रेमाची गोष्ट 2’. लव्हस्टोरींचे बादशहा दिग्दर्शक सतीश राजवाडे, दमदार तरुण कलाकार, नेत्रदीपक व्हीएफएक्स आणि रोमँसचा नवा अंदाज या सगळ्या गोष्टींमुळेच सध्या हा चित्रपट प्रेक्षकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय. त्यातच गौतमी पाटील हिचं थिरकायला लावणारं ठसकेबाज नृत्य या चित्रपटाचं आणखी एक आकर्षण ठरतंय.

हे सगळं खास असतानाच या चित्रपटातील आणखी एक खासियत म्हणजे स्वप्निल जोशी आणि भाऊ कदम ही जोडी! पहिल्यांदाच हे दोघं एका वेगळ्या कथानकात आणि अनोख्या भूमिकांमध्ये एकत्र झळकणार आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर त्यांच्या ऑनस्क्रीन ट्युनिंगची झलक मिळते. दोघांची उपस्थिती चित्रपटाला एक वेगळी ऊर्जा आणि रंगत देते. त्यामुळे या जोडीकडून प्रेक्षकांना एक ताजेपणाचा अनुभव मिळणार, हे नक्की.

चित्रपटात स्वप्निल जोशी आणि भाऊ कदम देवाची भूमिका साकारत आहेत. यापूर्वी स्वप्निलने श्रीकृष्णाची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. आता ‘प्रेमाची गोष्ट 2’मधून तो पुन्हा एकदा देवाच्या रूपात, नव्या शैलीत आणि भाऊ कदमसोबतच्या हटके केमिस्ट्रीमधून प्रेक्षकांसमोर येतोय. सतीश राजवाडे यांचं जादुई दिग्दर्शन, रोमँटिक कहाणीची जादू आणि या जोडीची खास उपस्थिती, हे सगळं मिळून ‘प्रेमाची गोष्ट 2’ प्रेक्षकांसाठी दिवाळीतील सर्वात सुंदर सिनेमॅटिक गिफ्ट ठरणार आहे.

एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचे निर्माते संजय छाब्रिया आणि सह-निर्माते अमित भानुशाली यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून, दिग्दर्शनाची जबाबदारी सतीश राजवाडे यांनी सांभाळली आहे. या चित्रपटात ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्निल जोशी, भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘प्रेम आणि नशिबाचा हा जादुई प्रवास’ प्रेक्षकांना 21 ऑक्टोबर म्हणजेच दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अनुभवायला मिळणार आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये लालितच्या आयुष्यात आलेली वळणं ठळकपणे दिसत आहेत. लग्न, घटस्फोट आणि त्यानंतर पुन्हा समोर आलेलं जुनं प्रेम. या सगळ्यामुळे त्याचं आयुष्य जणू एका वादळात सापडलं आहे. स्वतःच्या चुकांचा आणि नशिबाचा हिशेब करताना तो सगळ्याचा दोष देवाला देताना दिसतोय. परंतु देव त्याला खरंच नशिब बदलण्याची दुसरी संधी देणार का? आणि दिलीच, तरी लालितचं नशिब खरंच बदलेल का? याचं उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे.

चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.