AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 16 | शर्लिन चोप्राने साजिद खान विरोधात दाखल केला गुन्हा, वाचा प्रकरण

शर्लिन चोप्रा फक्त सोशल मीडियावर आवाज उठून शांत बसली नाहीये तर तिने याप्रकरणात थेट पोलिस स्टेशन गाठले आहे.

Bigg Boss 16 | शर्लिन चोप्राने साजिद खान विरोधात दाखल केला गुन्हा, वाचा प्रकरण
| Updated on: Oct 20, 2022 | 8:42 AM
Share

मुंबई : बिग बॉस 16 (Bigg Boss 16) मध्ये जबरदस्त हंगामा होताना दिसत आहे. मात्र, बिग बॉसच्या घरामध्ये आणि बाहेर एकाच व्यक्तीची चर्चा होत आहे, ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून साजिद खान आहे. बिग बॉसच्या घरात सर्वांसोबत साजिद खान चांगले वागत आहे. परंतू साजिद खानच्या विरोधात घरात (Sajid Khan) बाहेर अभिनेत्रींनी रान उठवले आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्राने साजिद खानच्या बिग बॉसच्या घरातील प्रवेशावर नाराजी व्यक्त करत आवाज उठवला होता. त्यानंतर अनेक अभिनेत्री पुढे आल्या आणि सलमान खान (Salman Khan) आणि बिग बॉसच्या निर्मात्यांवर टीका केली.

शर्लिन चोप्रा फक्त सोशल मीडियावर आवाज उठून शांत बसली नाहीये तर तिने याप्रकरणात थेट पोलिस स्टेशन गाठले आहे. नुकतेच शर्लिन चोप्राने गुन्हा दाखल केला. शर्लिनने बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक साजिद खानविरुद्ध जुहू पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे साजिद खानच्या अडचणींमध्ये वाढ होणार हे नक्कीच.

साजिद खानने तब्बल 4 वर्षांनंतर पडद्यावर पुनरागमन केले आहे. मात्र, साजिदला बिग बाॅसच्या घरात पाहून अनेकांना मोठा धक्काच बसला होता. आता शर्लिन चोप्राने साजिद खानला कायद्याच्या कचाट्यात अडकवले आहे. गुन्हा दाखल करण्याच्या अगोदर शर्लिनने एक पत्रकार परिषद घेत साजिद खानवर गंभीर आरोप केले होते.

Follow Us
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी