Mi Honar Superstar : अंकुश चौधरीची 15 वर्षांनंतर टेलिव्हिजनवर दमदार एण्ट्री, पार पाडणार ‘मी होणार सुपरस्टार’मध्ये जजची भूमिका

‘मी होणार सुपरस्टार’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये अंकुश सुपर जजची जबाबदारी पार पाडणार आहे. (Ankush Chaudhary's strong entry on television after 15 years, will play the role of a judge in 'Mi Honar Superstar')

Mi Honar Superstar : अंकुश चौधरीची 15 वर्षांनंतर टेलिव्हिजनवर दमदार एण्ट्री, पार पाडणार ‘मी होणार सुपरस्टार’मध्ये जजची भूमिका

मुंबई : सुपरस्टार अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) आता तब्बल 15 वर्षांनंतर टेलिव्हिजनवर दमदार एण्ट्री घेण्यासाठी सज्ज झाला आहे. स्टार प्रवाहवर 21 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार’ (Mi Honar Superstar) या डान्स रिअॅलिटी शोमध्ये अंकुश सुपर जजची जबाबदारी पार पाडणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातलं (Maharashtra) टॅलेण्ट या डान्सच्या मंचावर अवतरणार आहे. त्यामुळे सुपरस्टार होण्याचं कुणाचं स्वप्न पूर्ण होणार याची उत्सुकता नक्कीच असेल.

सुपरस्टार निवडण्याची मोठी जबाबदारी अंकुश खांद्यावर

महत्त्वाचं म्हणजे नृत्याचे वेगवेगळे प्रकार तितक्याच हटके पद्धतीने ‘मी होणार सुपस्टार’च्या या मंचावर सादर होणार आहेत. त्यामुळे ही स्पर्धा नक्कीच प्रचंड अटीतटीची असणार आहे. या स्पर्धकांमधून सुपरस्टार निवडण्याची मोठी जबाबदारी अंकुश चौधरीच्या खांद्यावर असणार आहे.

पाहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

या ग्रॅण्ड रिअलिटी शोविषयी सांगताना अंकुश म्हणाला, ‘पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे वळताना अतिशय आनंद होत आहे. विशेष म्हणजे मी महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहसोबत पहिल्यांदाच जोडला जातोय आणि जजची भूमिकाही पहिल्यांदाच पार पाडतोय. डान्स हा माझ्या अतिशय आवडीचा विषय आहे. या शोमध्ये जरी मी जज असलो तरी मी टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिनिधीची जबाबदारी पार पाडणार आहे. फरक एवढाच असेल की प्रेक्षक या कार्यक्रमाचा आनंद घरबसल्या घेतील आणि मी प्रत्यक्ष घेईन. मी होणार सुपरस्टार हा कार्यक्रम नवी ऊर्जा घेऊन येणार आहे. पुन्हा एकदा तीच उर्मी आणि तोच उत्साह या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुभवायला मिळेल. त्यामुळे मी या शोसाठी प्रचंड उत्सुक आहे. तेव्हा पाहायला विसरु नका मी होणार सुपरस्टार 21 ऑगस्टपासून दर शनिवार आणि रविवार रात्री 9 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’

संबंधित बातम्या

Kangana Ranaut : मुंबईत अडचणींमध्ये वाढ तर तिकडे बुडापेस्टमध्ये ड्रामा क्विनचं ग्लॅमरस फोटोशूट, पाहा कंगना रनौतचे खास फोटो 

Ani kay hava 3 : रिअल लाईफ टू रिल लाईफ, ‘आणि काय हवं’च्या तिसऱ्या सीझनसाठी उमेश आणि प्रिया सज्ज

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI