Mazhi Tuzhi Reshimgath: ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत अखेर होणार नेहा- यशचा साखरपुडा

मालिकेत आता लवकरच यश आणि नेहा यांच्या नव्या नात्याची सुरुवात होणार आहे. त्यांचा साखरपुडा प्रेक्षकांना लवकरच मालिकेत पाहायला मिळणार आहे.

Mazhi Tuzhi Reshimgath: 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत अखेर होणार नेहा- यशचा साखरपुडा
Mazhi Tuzhi ReshimgathImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 9:40 AM

झी मराठी वाहिनीवर अत्यंत लोकप्रिय मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’चा (Mazhi Tuzhi Reshimgath) चाहतावर्ग खूप मोठा आहे. या मालिकेतील यश (Shreyas Talpade) आणि नेहाची (Prathana Behere) जोडी तसंच परीचा निरागस अभिनय या गोष्टींनी प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. ही मालिका अगदी कमी काळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेत आता लवकरच यश आणि नेहा यांच्या नव्या नात्याची सुरुवात होणार आहे. त्यांचा साखरपुडा प्रेक्षकांना लवकरच मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत गेल्या काही काळापासून एक वेगळाच ट्विस्ट पहायला मिळतोय. परी नेहाची मुलगी आहे पण हे यशाच्या आजोबाना माहित नाही. त्यांना वाटतंय नेहाचे शेजारी बंडू काका यांची नात परी आहे. तसेच यश आणि नेहाचं लग्न झालं आहे असेही आजोबांना वाटत आहे.

आजोबांची प्रकृती खराब असल्याचे निमित्त साधून यशची काकी सिम्मीने हा सगळा व्याप वाढवून ठेवला आहे. त्यात आता परीच घरात असणं आजोबांसाठी उल्हासदायी ठरतंय. इतकंच काय तर तिच्या असण्याने घरातील बरीच नाती सुधारताना दिसत आहेत. हे पाहून आजोबांनी परीला दत्तक घेण्याचे ठरवले आहे. विश्वजित आणि मिथिलाच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त परीला त्यांच्यासाठी आपण दत्तक घेत आहोत अशी आजोबा घोषणा करतात. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. पण यश परीचे नेहासोबतचे आणि साहजिकच त्याच्यासोबत असलेले नाते आजोबांना सांगतो. काही वेळासाठी सगळं काही संपत का काय, अशी भावना सर्वांच्याच मनात येते. पण सुज्ञ विचारांनी आजोबा या नात्याचा स्वीकार करतात आणि पणती म्हणून परीचाही स्वीकार करतात. यानंतर यश आणि नेहाचा साखरपुडा ठरतो.

हे सुद्धा वाचा

पहा नेहा-परीचा खास व्हिडीओ-

मालिकेच्या पुढच्या काही भागांमध्ये त्यांचा साखरपुडा देखील होणार आहे. या खास प्रसंगांचे क्षण झी मराठीच्या सोशल मीडियावर प्रेक्षकांना पाहायला मिळाले. या फोटोज मधून नेहा आणि यशचा साखरपुड्याचा लूक शेअर करण्यात आलाय. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.