‘कसौटी जिंदगी की’ फेम अभिनेता प्राचीन चौहानला अटक, विनयभंगाच्या आरोपानंतर पोलिसांची कारवाई

‘डेली सोप क्वीन’ एकता कपूर हिचा लोकप्रिय कार्यक्रम ‘कसौटी जिंदगी की’ (Kasautii Zindagii Kay) या मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण करणारा अभिनेता प्राचीन चौहान (Pracheen chauhan) याला विनयभंगाच्या गंभीर आरोपाखाली मुंबईच्या मालाड पूर्व येथून पोलिसांनी अटक केली आहे.

‘कसौटी जिंदगी की’ फेम अभिनेता प्राचीन चौहानला अटक, विनयभंगाच्या आरोपानंतर पोलिसांची कारवाई
प्राचीन चौहान

मुंबई : ‘डेली सोप क्वीन’ एकता कपूर हिचा लोकप्रिय कार्यक्रम ‘कसौटी जिंदगी की’ (Kasautii Zindagii Kay) या मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण करणारा अभिनेता प्राचीन चौहान (Pracheen chauhan) याला विनयभंगाच्या गंभीर आरोपाखाली मुंबईच्या मालाड पूर्व येथून पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेत्याविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354,342,323, 506 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने मालाड पोलीस स्टेशनमध्ये प्राचीनविरूद्ध तक्रार केली होती (Mumbai Police arrest Kasautii Zindagii Kay fame actor Pracheen chauhan in Molestation case).

अभिनेता प्राचीन चौहान सध्या यूट्यूबवर ‘शिट्टी आयडियाज ट्रेंडिंग’ (Shitty Ideas Trending) या  वेब सीरीजमध्ये छवी मित्तल आणि पूजा गौर यांच्यासोबत काम करत आहे. तो साकारत असलेला अभिमन्यू लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेनंतर प्राचीनने सोनी टीव्हीवर एकता कपूरच्याच ‘कुछ झुकी सी पलकें’ या आणखी एका मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय प्राचीनने ‘सिंदूर तेरे नाम का’, ‘साथ फेरे’ आणि ‘माता पिता के चरणो में स्वर्ग’ या सारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले होते.

बर्‍याच प्रसिद्ध कलाकारांचा जवळचा मित्र

प्राचीनने नुकताच ऑफ एअर झालेला स्टार प्लसचा शो ‘शादी मुबारक’मध्येही काम केले होते. त्याच्या अटकेच्या बातमीने पुन्हा एकदा टीव्ही इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. ‘कुंडली भाग्य’ अभिनेता धीरज धुपर आणि ‘लक्ष्मी बॉम्ब’ फेम अभिनेता शरद केळकर हे दोघे प्रचीनचे फार चांगले मित्र आहेत. परंतु, अद्यापपर्यंत या संपूर्ण प्रकरणाबाबत कोणत्याही अभिनेत्याने आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.

मनोरंजन विश्वात नेमकं चाललंय काय?

गेल्या एका महिन्यात टीव्ही इंडस्ट्रीत महिलांवर कथित अत्याचाराची ही तिसरी मोठी बातमी आहे. यापूर्वी ‘नागिन’ फेम अभिनेता पर्ल व्ही पुरी याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती, पर्ल सध्या जामिनावर सुटला आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये नैतिकची भूमिका साकारणार्‍या अभिनेता करण मेहरावरही पत्नी निशा रावल हिने प्राणघातक हल्ला केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आता करण आणि त्याच्या कुटुंबियांवर अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता ही तिसरी घटना, यामुळे मनोरंजन विश्वात महिला कितपत सुरक्षित आहेत? आणि हे नेमकं काय चाललंय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

(Mumbai Police arrest Kasautii Zindagii Kay fame actor Pracheen chauhan in Molestation case)

हेही वाचा :

Photo : हृतिक रोशन ते करिष्मा कपूर ‘या’ कलाकारांनी घटस्फोटानंतर घेतला एकटं राहण्याचा निर्णय; दुसरं लग्न नाहीच

PHOTO | मंदिरा-राजचा मढस्थित ‘पूल साईड’ बंगला दिला जातोय भाडेतत्वावर, जाणून घ्या एका दिवसाचे भाडे किती?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI