Photo : हृतिक रोशन ते करिष्मा कपूर ‘या’ कलाकारांनी घटस्फोटानंतर घेतला एकटं राहण्याचा निर्णय; दुसरं लग्न नाहीच

बॉलिवूडमधील अनेक कलाकार घटस्पोट झाल्यानंतर एकटे राहत आहेत. त्यांनी अजूनही दुसरं लग्न केलेलं नाही. (Hrithik Roshan to Karisma Kapoor these actors decided to live alone after divorce, did not remarry)

1/6
करिश्मा कपूर : करिश्मा कपूरनं संजय कपूरसोबत लग्न केलं होतं. दोघांचा 2016 मध्ये घटस्फोट झाला. त्यांचा घटस्फोट प्रचंड चर्चेत होता. करिश्मा आणि संजय यांना दोन मुलं म्हणजेच एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आता करिष्मा एकटीच दोन्ही मुलांना सांभाळत  आहे. तिने दुसरं लग्न केलं नाही.

2/6
पूजा भट्ट : महेश भट्ट यांची मोठी मुलगी पूजा भट्ट तिच्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असते. तिने मनीष माखीजाशी लग्न केलं होतं. प्रदीर्घ संबंधानंतर 2014 मध्ये दोघे वेगळे झाले. दोघं अजूनही चांगले मित्र आहेत.

3/6
हृतिक रोशन : हृतिक रोशननं अभिनेता संजय खानची मुलगी सुजैनसोबत प्रेमविवाह केला होता. दोघांचीही छान केमिस्ट्री होती. दोघांचं लग्न 2000 ते 2014 पर्यंत चाललं. या लग्नापासून दोघांनाही दोन मुलं आहेत. घटस्फोटानंतरही हृतिक आणि सुजैनची चांगली मैत्री आहे. विभक्त झाल्यानंतर हृतिकनं दुसरे लग्न केलं नाही.

4/6
कोंकणा सेन : अभिनेत्री कोंकणा सेनने 2010 मध्ये रणवीर शोरेशी लग्न केलं होतं, दोघंही 2020 मध्ये वेगळे झाले. या लग्नातून दोघांना एक मूलही आहे. घटस्फोटानंतर कोंकणाने पुन्हा लग्न केले नाही.

5/6
अमृता सिंग : अमृता सिंगनं अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं होतं. या लग्नापासून त्यांना दोन मुलं आहेत. एक मुलगा इब्राहिम अली खान आणि एक मुलगी सारा अली खान. सैफ अली खानपासून घटस्फोटानंतर अमृता यांनी पुन्हा लग्न केले नाही. मात्र, सैफनं अभिनेत्री करीना कपूरशी लग्न केलं.

6/6
चित्रांगदा सिंह : अभिनेत्री चित्रांगदानं गोल्फर ज्योती सिंह रंधावाशी लग्न केलं होतं. 2014 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिने तिचे संपूर्ण लक्ष तिच्या करिअरवर केंद्रित केले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI