TMKOC: ‘तारक मेहता..’च्या चाहत्यांसाठी खूशखबर! ‘ही’ लोकप्रिय भूमिका परत येणार?

'तारक मेहता..'च्या प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार? नवरात्रीत मालिकेत होणार धमाका!

TMKOC: 'तारक मेहता..'च्या चाहत्यांसाठी खूशखबर! 'ही' लोकप्रिय भूमिका परत येणार?
TMKOCImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 1:31 PM

मुंबई- गेल्या 14 वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतेय. यातील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. जेठालाल, दयाबेन, टप्पू, बबिता यांसारख्या भूमिका घरघरात पोहोचल्या. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत.. सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना ही मालिका आवडते. अशातच प्रेक्षकांसाठी निर्मात्यांकडून नवरात्रीची (Navratri) खास भेट मिळणार असल्याचं कळतंय. या मालिकेतील सर्वांत लोकप्रिय भूमिका लवकरच परतणार असल्याचं समजतंय.

गेल्या काही वर्षांत या मालिकेतील बरेच कलाकार बदलले. जुन्या कलाकारांची जागा काही नव्या कलाकारांनी घेतली. मात्र गेल्या 3 वर्षांपासून या मालिकेत दयाबेनची भूमिका परतलीच नाही. अभिनेत्री दिशा वकानीने बाळंतपणासाठी सुट्टी घेत ही मालिका सोडली होती. मात्र त्यानंतर ती मालिकेत परतलीच नाही. दिशा मालिकेत परत येणार की नाही यावरून नेहमीच निर्मात्यांना प्रश्न विचारले जातात.

हे सुद्धा वाचा

आता निर्माते असितकुमार मोदी हे मालिकेत दयाबेनची भूमिका आणण्यावर ठाम आहेत. मात्र दिशाच दयाबेनच्या भूमिकेत परत येणार की दुसरी अभिनेत्री तिची जागा घेणार हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला मालिकेत दयाबेनची एण्ट्री करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.

तीन वर्षांपूर्वी दिशा मॅटर्निटी लीव्हवर गेली होती. मुलाच्या जन्मानंतर ती मालिकेत परत येणार अशी चर्चा होती. मात्र तिने कुटुंबाला प्राधान्य दिलं. दरम्यानच्या काळात दिशा दुसऱ्यांना आई झाली. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्याने ती मालिकेत परत येण्याबाबत साशंक असल्याचं म्हटलं जात होतं.

निर्माते असितकुमार मोदी यांनी अनेकदा दिशाला मालिकेत परत आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश मिळालं नाही. आता नवरात्रीच्या मुहूर्तावर मालिकेत दयाबेन म्हणून कोणती अभिनेत्री प्रेक्षकांसमोर दिसणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.