TMKOC: ‘तारक मेहता..’च्या नव्या एपिसोडवर चाहते नाराज; शैलेश लोढाच्या जागी नवा अभिनेता

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 14, 2022 | 1:38 PM

गेल्या 14 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या 14 वर्षांत मालिकेतील टप्पू, सोढी, सोनू, अंजली भाभी, नट्टू काका यांसारख्या भूमिका विविध कारणांमुळे बदलल्या गेल्या.

TMKOC: 'तारक मेहता..'च्या नव्या एपिसोडवर चाहते नाराज; शैलेश लोढाच्या जागी नवा अभिनेता
TMKOC
Image Credit source: Twitter

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (TMKOC) या लोकप्रिय मालिकेत गेल्या काही महिन्यांपासून बरेच बदल पहायला मिळाले. यातील बऱ्याच कलाकारांची जागा आता नव्या कलाकारांनी घेतली आहे. सोशल मीडियावर या मालिकेतील तारक मेहताच्या भूमिकेवरून चर्चा सुरू होती. मालिकेत अभिनेते शैलेश लोढा (Shailesh Lodha) हे तारकची भूमिका साकारत होते. मात्र आता त्याची जागा नव्या कलाकाराने घेतली आहे. त्यामुळे नव्या कलाकारासोबत नवा एपिसोड सुरू होताच प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

तारक मेहता.. या मालिकेवरून सध्या सोशल मीडियावर विविध मीम्स व्हायरल होत आहेत. मालिकेत शैलेश लोढा यांची जागा अभिनेता सचिन श्रॉफने घेतली आहे. सचिनला त्या भूमिकेत पाहणं प्रेक्षकांना फारसं पसंत पडलं नाही. म्हणून या नव्या एपिसोडवरून ट्विटरवर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

मालिकेत शैलेश यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, असं एका युजरने म्हटलंय. तर दिवसेंदिवस ही मालिका कंटाळवाणी होऊ लागली आहे, अशी कमेंट दुसऱ्या नेटकऱ्याने केली. गेल्या 14 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या 14 वर्षांत मालिकेतील टप्पू, सोढी, सोनू, अंजली भाभी, नट्टू काका यांसारख्या भूमिका विविध कारणांमुळे बदलल्या गेल्या. काही दिवसांपूर्वी या मालिकेत तारकची भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी मालिकेचा निरोप घेतला.

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता सचिन श्रॉफ या मालिकेत आता तारकच्या भूमिकेत दिसतोय. सचिनने याआधी प्रकाश झा यांच्या ‘आश्रम’ या वेब सीरिजमध्येही भूमिका साकारली आहे. त्याचसोबत ‘गुम है किसी के प्यार में’ या लोकप्रिय मालिकेतही तो झळकला होता.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI