Yeu Kashi Tashi Mi Nandayla : दारात येणार वरात, पण स्वीटू नवरी म्हणून जाईल का खानविलकरांच्या घरात?, नव्या प्रोमोने वाढवली उत्सुकता

सध्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ अनेक प्रोमो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. अशात आता खानविलकरांच्या घरी स्वीटू नांदायला जाईल का? असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. (Yeu Kashi Tashi Mi Nandayla: Will Sweetu go to the Khanvilkar's house as a bride ?, new promo raises curiosity)

Yeu Kashi Tashi Mi Nandayla : दारात येणार वरात, पण स्वीटू नवरी म्हणून जाईल का खानविलकरांच्या घरात?, नव्या प्रोमोने वाढवली उत्सुकता

मुंबई : छोट्या पडद्यावर सध्या चर्चेत असलेली ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) ही मालिका देखील आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिका शेवटच्या टप्प्याकडे सरकत असल्याने, मालिकेच्या कथानकाने जोरदार वेग पकडला आहे.

आता स्वीटूची आई अर्थात नलू मावशी हिचा स्वीटू आणि ओमच्या नात्याला असलेला विरोध पूर्णपणे मावळला आहे. ओमने आपल्या मुलीच्या आयुष्यात येऊ नये, यासाठी नलूने त्याला अनेक कष्ट करायला लावले. मात्र, कुठल्या परीक्षेला न घाबरता आपल्या प्रेमावर विश्वास ठेऊन ओम नेहमीच जिंकत राहिला. अर्थात त्याच्या या प्रामाणिक प्रयत्नांमुळे नलूचा विरोध आता होकारात बदलला आहे. तिने या दोघांच्या नात्याला अखेर परवानगी दिली आहे.

2 तासांचा विषेश भाग

खानविलकरांच्या घरी स्वीटू जाईल का नांदायला?

सध्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ अनेक प्रोमो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. अशात आता खानविलकरांच्या घरी स्वीटू नांदायला जाईल का? असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे.

आपलं सुखाचं हक्काचं माहेर सोडून मुलगी एका वेगळ्याच कुटुंबात प्रवेश करते. असे घर जे इथून पुढे तिचं होणार असतं. या प्रवासात तिला पतीची साथ असली तरी एका जिवाभावाच्या मैत्रिणीची तिला कायमच उणीव भासत असते. अशावेळी सासूच जर तिची सखी झाली तर नात्यांचा गोडवा अधिकच वाढतो. आणि घराचं गोकुळ होतं. अशाच एका गोड नात्याची कथा सांगणारी ही मालिका आहे. अद्याप लग्नाचा ट्रॅक आला नसला तरी शकु आणि स्वीटूची नात्यानं या दोघी सासू सून आहेत. पण मनानं मैत्रीच्या धाग्यानं घट्ट बांधल्या गेल्या आहेत.मिश्किल सासू आणि खट्याळ सून मिळून घरात वेगळीच गंमत करतात. आणि या गंमतीचच नाव आहे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’.

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI