AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SaReGaMaPa L’il Champs  | स्पर्धकांचे ताई-दादा बनून त्यांना ग्रूम करू, ‘पंचरत्न’ मुग्धा वैशंपायनची ग्वाही!

12 वर्षांपूर्वी झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’च्या मंचावरून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या ‘पंचरत्नां’पैकी सगळ्यात लहान चिमुरडी म्हणजे मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan). आता मुग्धा जजच्या रूपात ‘सारेगमप’मध्ये दिसणार आहे.

SaReGaMaPa L’il Champs  | स्पर्धकांचे ताई-दादा बनून त्यांना ग्रूम करू, ‘पंचरत्न’ मुग्धा वैशंपायनची ग्वाही!
मुग्धा वैशंपायन
| Edited By: | Updated on: Jun 16, 2021 | 8:32 AM
Share

मुंबई : 12 वर्षांपूर्वी झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’च्या मंचावरून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या ‘पंचरत्नां’पैकी सगळ्यात लहान चिमुरडी म्हणजे मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan). आता मुग्धा जजच्या रूपात ‘सारेगमप’मध्ये दिसणार आहे. एक तपाच्या या काळामध्ये मुग्धानं बरंच काही आत्मसात केलं आहे. महाविद्यालयीन शिक्षणासोबतच गायनातही ती पारंगत झाली आहे. या शोच्या निमित्ताने तिच्या सोबत केलेल्या खास गप्पा…(Zee Marathi SaReGaMaPa L’il Champs winner Mugdha Vaishampayan talks about upcoming season)

तुला गायनाची गोडी कशी लागली?

– सध्या मी पंडीता शुभदा पराडकर यांच्याकडे गाणं शिकतेय. माझ्या घरी म्युझिकल बॅग्राऊंड नाही. बाबा रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये जॅाब करतात आणि आई गृहिणी आहे. बाबांच्या बाबांना म्हणजे माझ्या आजोबांना गाणी ऐकायला आवडायचं. त्या काळी रात्री रेडिओवर नाट्य संगीत किंवा क्लासिकल संगीत लागायचं, ते आजोबा न चुकता ऐकायचे. बाबांनाही त्याची गोडी लागली. मी लहान असताना बाबाही गाणी लावायचे. त्यामुळे तेव्हापासूनच गाणं कानावर पडत गेलं. बाबांना तबला वाजवायला आवडत असल्यानं आम्ही अलिबागला शिफ्ट झाल्यावर त्यांना तबला शिकवायला गुरुजी यायचे. ते हार्मोनियमवर साथ करायचे, तेव्हा मी पूर्ण वेळ तिथेच असायचे. गुरुजी गेल्यावर हार्मोनियमवर हात पुरत नसूनही मी गाण्याचा प्रयत्न करायचे. त्यावेळी बाबांनी माझा गायनाचा कल ओळखला. मग कौटुंबिक कार्यक्रमामध्ये काहीतरी गाणं वगैरे म्हणायचे.

तू जेव्हा सारेगमप लिटिल चॅम्प्स मध्ये सहभागी झालीस, तो क्षण तुला आठवतोय का?

– चौथी इयत्तेत शिकत असताना सारेगमपच्या ऑडिशन्स सुरू झाल्याचं टीव्हीवर दाखवलं गेलं. माझ्या क्लासटीचर हळदवणेकर यांनी याबाबत बाबांना सांगितलं. आपण मुग्धाला तिथे घेऊन जाऊया, असं त्या म्हणाल्या, पण मुग्धा फार छोटी असून, ती गाणं शिकलेली नसल्यानं स्पर्धेत सहभागी होण्याइतकी छान गात नसल्याचं आई-बाबांना वाटत होतं. तिथे मुंबई-पुण्यातील मुलं असल्यानं मुग्धा नक्की एलिमीनेट होणार, असं त्यांना वाटत होतं. यासाठी ते टाळत होते, पण क्लासटीचर खूपच मागे लागल्या होत्या. त्या स्वत: मला घेऊन जायला तयार झाल्या. त्यामुळं आई-बाबांपुढे पर्याय नव्हता. मी एलिमिनेट होऊन एका दिवसात परतणार याची आई-बाबांना पक्की खात्री असल्यानं फक्त अंगावरच्या कपड्यांसह मुंबईला गेलो होतो. त्याचवेळी मी मुंबईतील फायनल राऊंडसाठी सिलेक्ट झाले.

तुला मिळालेलं यश तू लहान वयात कसं हाताळलंस?

– मी खूप लहान असताना ‘सारेगमप’मध्ये यश मिळवल्यानं आपण खूप काही मोठं केलंय किंवा आपल्याला खूप प्रसिद्धी मिळतेय, याबाबत मला काहीच कळत नव्हतं. माझा पहिला एपिसोड शूट झाल्यानंतर 15 दिवसांनी तो एपिसोड टेलिकास्ट झाला. सर्वांना खूप उत्सुकता होती. माझं गाणं पाहिल्यावर मी बाबांना विचारलं की, अच्छा आपण जे तिथे गेलो होतो, ते गाणं इथे दिसण्यासाठी होतं का? इतकं ते निरागस होतं. त्यामुळं मी इतर लहान मुलांप्रमाणेच निरागस आणि अजाण होते. मुख्याध्यापकांना माझं खूप कौतुक होतं, पण माझ्यामुळे इतर मुलांना वाईट वाटू नये, यासाठी त्यांनी मला सर्वांसारखीच वागणूक दिली. आई-बाबांनीही मला वेगळी वागणूक देऊ नका, असं सर्वांना सांगितलं होतं. आपण काहीतरी साध्य केलं आहे या विचाराने हुरळून जाऊ नये, यासाठी त्यांनी खूप हेल्दी वातावरण ठेवलं होतं.

सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या नवीन पर्वातील टॅलेंटबद्दल काय सांगशील?

– आम्ही टेक्नोसॅव्ही नव्हतो. त्यामुळं एखादा कलाकार स्वत:ला कसा प्रेझेंट करू शकतो याबाबत काही ठाऊक नव्हतं. सारेगमपनंतर जे काही केलं ते लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं, हे आम्हाला समजत नव्हतं. आताची जनरेशन टेक्नोसॅव्ही आहे. त्यांना स्वत:ला प्रमोट कसं करायचं, कसं प्रेझेंट करायचं हे माहित आहे. हे करताना त्यांचा गाण्यावरचा फोकस कमी होता कामा नये, याची काळजी आम्हाला घ्यायची आहे. यासाठी त्यांना ग्रूम करण्याचा प्रयत्न करू. त्यांचे ताई-दादा बनून त्यांना समजावू. जज या भूमिकेत असलो, तरी ताई-दादाच्या नजरेतून आम्ही त्यांना जज करणार आहोत, ही खूप महत्त्वाची गोष्ट वाटते.

(Zee Marathi SaReGaMaPa L’il Champs winner Mugdha Vaishampayan talks about upcoming season)

हेही वाचा :

छोट्यांचं मोठं स्वप्नं साकारणार ‘सा रे ग म प लिटील चॅम्प’, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

The Family Man 2 मुळे ज्यांची सर्वाधिक नेटवर चर्चा आहे ते चेल्लाम सर नेमके कोण आहेत?

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.