Thank God: ‘थँक गॉड’ च्या मागचे विघ्न हटेना; रिलीज आधीच मध्यप्रदेशाच्या मंत्र्यांनी केली बॅनची मागणी

इंदर कुमारच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट कुवेतच्या सेन्सॉर बोर्डाने पास केला नाही. म्हणजेच आता हा चित्रपट तिथे प्रदर्शित होऊ शकणार नाही. कर्नाटकात हिंदू जनजागृती समितीने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत निदर्शने केली.

Thank God: 'थँक गॉड' च्या मागचे विघ्न हटेना; रिलीज आधीच मध्यप्रदेशाच्या मंत्र्यांनी केली बॅनची मागणी
Ajay Devgn'sImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 12:13 PM

बॉलीवूड अभिनेता अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला ‘थँक गॉड'(Thank God) चित्रपटासद्या चांगलाच चर्चेत आहे. सोशल मीडियावर (Social Media) या चित्रपटाबाबतबॉयकॉट ट्रेंड चालल्याने हा चित्रपट चांगलाच अडचणीत आला आहे. हे कमी काय म्हणून आता कुवेतमध्ये यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचवेळी कर्नाटकातही या चित्रपटाला प्रचंड विरोध होत आहे. या चित्रपटात हिंदू देव (Hindu God)देवतांच्या बद्दल दाखवण्यात आलेल्या गोष्टींना प्रेक्षकांनी विरोध केला आहे.

अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अडचणी वाढत आहेत. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे, मात्र त्याआधीच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला, तेव्हाच सोशल मीडियावर विरोध सुरू झाला.

आता मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, भाजप नेते आणि शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी अनुराग ठाकूर यांना पत्र लिहिले आहे. अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या ‘थँक गॉड’ या चित्रपटात देवाचे रूप चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळेच त्यांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा

‘थँक गॉड’ चित्रपटाचा ट्रेलर 9 सप्टेंबर रोजी रिलीज झाला, त्याच दिवशी #BoycottThankGod ट्विटरवर ट्रेंड करू लागला. या चित्रपटात भगवान चित्रगुप्त यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप यूजर्सने केला आहे. लोकांनी चित्रपटाच्या निर्मात्यांवर हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप केला आणि चित्रपटाला जोरदार विरोध केला.

इंदर कुमारच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट कुवेतच्या सेन्सॉर बोर्डाने पास केला नाही. म्हणजेच आता हा चित्रपट तिथे प्रदर्शित होऊ शकणार नाही. कर्नाटकात हिंदू जनजागृती समितीने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत निदर्शने केली. बॉलीवूडमध्ये हिंदू देवदेवतांची खिल्ली उडवणे हा ट्रेंड बनला . आहे, असे युझर्सचे म्हणणे आहे. यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घातली पाहिजे अशी मागणी केली जात आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.