AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Timeless | संवादफेकीच्या जोरावर मिळाली प्रसिद्धी, त्याच आवाजाने शेवटी सोडली साथ, वाचा अभिनेते राजकुमार यांच्याबद्दल…

पूर्वीच्या काळातील सुप्रसिद्ध अभिनेते राजकुमार (actor Rajkumar) यांच्याबद्दल बर्‍याच गोष्टी आजही बोलल्या जातात. या अभिनेत्याने 1996मध्ये या जगाचा निरोप घेतला असला, तरी आजही त्यांची चर्चा तितकीच ऐकायला मिळते.

Timeless | संवादफेकीच्या जोरावर मिळाली प्रसिद्धी, त्याच आवाजाने शेवटी सोडली साथ, वाचा अभिनेते राजकुमार यांच्याबद्दल...
राजकुमार
| Edited By: | Updated on: Apr 22, 2021 | 9:17 AM
Share

मुंबई : पूर्वीच्या काळातील सुप्रसिद्ध अभिनेते राजकुमार (actor Raaj kumar) यांच्याबद्दल बर्‍याच गोष्टी आजही बोलल्या जातात. या अभिनेत्याने 1996मध्ये या जगाचा निरोप घेतला असला, तरी आजही त्यांची चर्चा तितकीच ऐकायला मिळते. परंतु, त्यांच्या आयुष्यातील या कहाण्या कधीच जुन्या होणार नाहीत. कारण, ते एका रहस्याप्रमाणे मनोरंजन विश्वात आले, त्यांनी इंडस्ट्रीमध्ये बर्‍याच रहस्यमय मार्गाने काम केले आणि जग सोडून गेल्यानंतरही अशीच काही रहस्ये मागे ठेवली आहेत. त्यांचे हे किस्से जितके मनोरंजक आहेत, तितकेच नव्या पिढीसाठी माहितीपूर्ण देखील आहेत (The unknown stories of veteran actor Raaj kumar).

आजही त्यांच्याबद्दल शेकडो कथा शोधल्या आणि वाचल्या जात असतात. अनेक जणांना त्यांचे आयुष्य इतके रहस्यमय का होते? असा प्रश्न देखील पडतो.  टीव्हीवर त्यांचा अभिनय पाहून लोकांना आजही खूप आनंद होतो आहे आणि त्यांना पडद्यावर पाहिल्यावर त्यांच्यासारखे बोलण्याचा प्रयत्न न करणारा क्वचितच कोणी असेल. चला तर, त्यांच्या आयुष्यातील अशाच काही गोष्टी जाणून घेऊया…

राजकुमार यांची शेवटची इच्छा

मुंबईच्या प्रसिद्ध वरळी या भागात सी फेसिंग बंगल्यात राहणाऱ्या राजकुमार यांनी आपल्या मृत्यूपूर्वी आपला मुलगा पुरु राजकुमार यांना सांगितले होते की, त्यांच्यावर अंत्यसंस्कार होईपर्यंत त्यांच्या मृत्यूची बातमी माध्यमांत आणि चित्रपटसृष्टीत पसरू नये. माध्यमात आपल्या मृत्यूचा तमाशा बनवा, अशी त्यांची अजिबात इच्छा नव्हती. लोकांनी त्यांच्याबद्दल निरनिराळ्या गोष्टी चर्चिल्या होत्या.

आवाजाने सोडली साथ

राजकुमार यांचा आवाज ज्याची संपूर्ण दुनिया दिवानी होती. त्यांच्या याच आवाजाच्या शैलीमुळे त्यांच्या संवादफेकीला धार आली होती. मात्र, शेवटी याच आवाजाने राजकुमार यांची साथ सोडली. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी, ते घश्याच्या कर्करोगाने ग्रस्त होते आणि त्यातच त्यांचा आवाज पूर्णपणे गेला. त्यांना बोलण्यात इतकी अडचण येऊ लागली की, नंतर त्याला हावभाव करून त्यांना त्यांचे म्हणणे सांगावे लागले (The unknown stories of veteran actor Raaj kumar).

काश्मिरी पंडित होते राजकुमार

राजकुमार यांचे खरे नाव कुलभूषण पंडित होते. त्याचे कुटुंब पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये राहत होते. 40च्या दशकात ते मुंबईत आले असं म्हणतात. येथे त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले, त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसात नोकरी मिळाली. त्यांनी माहीम येथील पोलीस स्टेशनमध्ये सब इन्स्पेक्टर पदावर काम करण्यास सुरुवात केली. एकदा या ठिकाणी ते चित्रपट निर्माता बलदेव दुबे यांना भेटले. कुलभूषण यांना त्यांनी चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. कुलभूषण यांना चित्रपटांची इतकी आवड होती की, त्यांनी आपली पोलीसांची नोकरी सोडली आणि ‘शाही बाजार’ या चित्रपटात भूमिका साकारली. यानंतर, त्यांना पुन्हा कधीही कामासाठी मागे वळून पहावे लागले नाही.

अभिमानी स्वभावामुळे चाहते नाराज

असे म्हटले जाते की राजकुमार यांची बोलण्याची शैली त्यांच्या चित्रपटातील संवादांशी अगदी मिळती-जुळती होती. ते साध्या आवाजात कोणाशीच बोलत नसतं. लोकांशी चित्रपट संवादांच्या शैलीत बोलणे ही त्यांची सवय बनली होती. ज्यामुळे लोकांना नेहमी असेच वाटले की, त्यांना त्यांच्या यशाचा खूप अभिमान होता.

(The unknown stories of veteran actor Raaj kumar)

हेही वाचा :

Radhe | ‘भाई का कमिटमेंट, ईद पर एंटरटेनमेंट’, थिएटर आणि ओटीटीवर एकाच दिवशी प्रदर्शित होणार सलमानचा चित्रपट!

Vijay Raaz Case | विनयभंगाची तक्रार, अभिनेता विजय राज यांना बॉम्बे हायकोर्टाकडून अंतरिम दिलासा!

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.