PHOTO | बँकेच्या नोकरीतून थेट मनोरंजन विश्वात पदार्पण, ‘कुछ तो गडबड है’ म्हणत गाजवला छोटा पडदा, वाचा शिवाजी साटम यांच्याबद्द्ल…

बॉलिवूड आणि टीव्हीचे प्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम (shivaji satam) यांचा आज वाढदिवस आहे, चाहते त्यांना ‘एसीपी प्रद्युम्न’ या नावानेही ओळखतात.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:36 PM, 21 Apr 2021
1/6
बॉलिवूड आणि टीव्हीचे प्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम (shivaji satam) यांचा आज वाढदिवस आहे, चाहते त्यांना ‘एसीपी प्रद्युम्न’ या नावानेही ओळखतात.
2/6
अभिनयाच्या जगात प्रवेश करण्यापूर्वी शिवाजी साटम ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’मध्ये रोखपाल म्हणून काम करायचे. नोकरीबरोबरच ते थिएटरमध्येही काम करू लागले.
3/6
प्रदीर्घ काळ थिएटरमध्ये काम केल्यावर त्यांनी 1980 मध्ये 'रिश्ते-नाते' या टीव्ही कार्यक्रमातून आपल्या अभिनयाची सुरूवात केली. त्यानंतर अभिनेता म्हणून ते बर्‍याच टीव्ही शोमध्ये दिसले. पण टीव्ही शो 'सीआयडी'मधून त्यांना खरी ओळख मिळाली
4/6
'सीआयडी' हा कार्यक्रम टीव्हीवरील दीर्घकाळ चालणाऱ्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत शिवाजी साटम यांनी एसीपी प्रद्युम्नची भूमिका साकारली, जी आजही खूप प्रसिद्ध आहे.
5/6
यानंतर शिवाजी साटम यांनी 'गुलाम-ए-मुस्तफा', 'सूर्यवंशम', 'वास्तव', 'पुकार', 'नायक', 'गर्व' आणि 'टॅक्सी नंबर 9211' या सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
6/6
शिवाजी साटम यांना अनेक उत्कृष्ट पुरस्कारांनीही गौरवण्यात आले आहे. सध्या जरी ते मनोरंजन विश्वापासून काहीसे लांब असले तरी त्यांची प्रसिद्धी तसूभरही कमी झालेली नाही.