दिग्दर्शकावर गंभीर आरोप, 18 वर्षीय तरुणीवर बलात्कार, ‘ती’ म्हणाली, ‘उद्ध्वस्थ केलं, सर्वांसमोर मला…’

'वडिलांसारखं मानलं पण त्याने मला उद्ध्वस्थ केलं, सर्वांसमोर मला...', 18 वर्षीय तरुणीवर प्रसिद्ध दिग्दर्शकाने केला बलात्कार... अखेर 'ती' धक्कादायक घटना समोर आलीच, इंडस्ट्रीचा काळा चेहरा अखेर समोर...

दिग्दर्शकावर गंभीर आरोप,  18 वर्षीय तरुणीवर बलात्कार, 'ती' म्हणाली, 'उद्ध्वस्थ केलं, सर्वांसमोर मला...'
Follow us
| Updated on: Sep 06, 2024 | 12:16 PM

गेल्या काही दिवसांपासून इंडस्ट्रीमध्ये महिलांवर होणारे अत्याचार समोर येत आहेत. अभिनेत्री त्यांच्यासोबत झालेल्या अत्याचार सांगत, न्याय मिळण्याची मागणी करत आहेत. न्यायमूर्ती हेमा समितीचा अहवाल समोर आल्यानंतर मल्याळम इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. अनेक अभिनेत्रींनी धक्कादायक खुलासे केल्यानंतर 90 च्या दशकातील केरळ सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्रीने दिग्दर्शकावर मानसिक, शारीरिक आणि लैंगिक छळाचे आरोप केले आहे. अभिनेत्रीवर जेव्हा अत्याचार होत होते तेव्हा अभिनेत्री फक्त 18 वर्षांची होती.

अभिनेत्री दिलेल्या माहितीनुसार, ती तामिळ सिनेमासाठी शुटिंग करत होती. तेव्हा अभिनेत्री फक्त 18 वर्षांची होती. तेव्हाच अभिनेत्रीला वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला. सांगायचं झालं तर, दिग्दर्शकाने मुलगी म्हणत स्वतःच्या पत्नीसमोर अभिनेत्रीसोबत करार केला होता. शुटिंग दरम्यान, अभिनेत्रीचं लैंगिक शोषण झालं. नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला.

अभिनेत्रीने अनेक वर्षांनंतर केलेला धक्कादायक खुलासा…

दिग्दर्शकावर गंभीर आरोप करत अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्याकडून त्याला एक मुल हवं होतं. तेव्हा मी फर्स्ट ईयरमध्ये होती. माझ्या कुटुंबियांना इंडस्ट्री आणि अभिनयाबद्दल काहीही माहिती नव्हतं. रंगभूमीमुळे मला तामिळ सिनेविश्वात काम करण्याची संधी मिळाली होती. अभिनेत्री रेवती माझ्यासाठी प्रेरणा होती. तेव्हा ती माझ्या घराजवळ राहायची. त्यामुळे मी देखील दिग्दर्शकाच्या पत्नीसमोर स्क्रिन टेस्ट दिली.’

‘दिग्दर्शक त्याच्या पत्नीसमोर मला चांगली वागणूक द्यायचा. मला जेवण द्यायचे, मिल्कशेकचं आमिष दाखवत माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करायचा. एकदा त्याची पत्नी नव्हती. त्या माणसाने मुलगी म्हणत माझं चुंबन घेतलं. काय होतंय मला काहीही कळलं नाही. सर्वकाही मला माझ्या मित्रांना सांगायचं होतं, पण मी सांगू शकली नाही. माझ्याकडून चूक झाली… मला सतत असं वाटतं होतं. कळत नव्हतं त्या माणसासोबत कसा व्यवहार करू…’

‘हळू-हळू दिग्दर्शकाने माझं शारीरिक आणि लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली. सतत माझा फायदा देऊन त्याने मला उद्ध्वस्त केलं. बळजबरी त्याने माझ्यावर बलात्कार केला. या दरम्यान देखील तो मला मुलगी म्हणत होता. हे सर्व जवळपास 1 वर्ष सुरु होतं. मी तेव्हा कॉलेजमध्ये होती त्यानं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

अभिनेत्रीने सांगितलं की, केरळ सरकार अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्मात्यांविरुद्ध दाखल झालेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाला आरोपीचे नाव जाहीर करेल.

'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ...
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ....