Akshay Kumar | धक्कादायक! ‘या’ बाॅलिवूड अभिनेत्रीने केले अक्षय कुमार याच्यावर गंभीर आरोप, त्याने माझ्यासोबत सेटवरच
बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून खास धमाल करताना दिसत नाहीयेत. एका मागून एक असे अक्षय कुमार याचे चित्रपट फ्लाॅप जात आहेत. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, याच्याकडे देखील प्रेक्षकांनी पाठ फिरवली.

मुंबई : अभिनेत्री शांति प्रिया तुम्हाला आवडते का? बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्यासोबत सौगंध या चित्रपटामध्ये शांति प्रिया ही मुख्य भूमिकेत होती. अक्षय कुमार आणि शांति प्रिया यांच्या जोडीने धमाका केला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शांति प्रिया ही बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. शांति प्रिया (Shanti Priya) आणि अक्षय कुमार यांनी ज्यावेळी सौगंध या चित्रपटात काम केले. त्यावेळी अक्षय कुमार हा बाॅलिवूडमधील नवखा अभिनेता होता. त्या तुलनेत शांति प्रिया हिची लोकप्रियता जास्त होती. मध्यंतरीच्या काळात शांति प्रिया ही बाॅलिवूडच्या (Bollywood) चित्रपटामध्ये दिली नाहीये. शांति प्रिया हिने सौगंधसारख्या चित्रपटांमध्ये धमाकेदार अभिनय केला आहे.
नुकताच शांति प्रिया हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये शांति प्रिया हिने अक्षय कुमार याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. शांति प्रिया हिचे बोलणे ऐकून अक्षय कुमार याच्या चाहत्यांना देखील धक्का बसलाय. शांति प्रिया म्हणाली की, मी काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार याला भेटण्यासाठी चित्रपटाच्या सेटवर गेले होते. त्यावेळी अक्षय कुमार हा सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत शूटिंग करत होता.
विशेष म्हणजे ज्यावेळी मी चित्रपटाच्या सेटवर गेले. त्यावेळी अक्षय कुमार याने सोनाक्षी सिन्हा हिची देखील भेट करून दिली. मला बाॅलिवूडमध्ये परत एकदा पर्दापण करायचे असल्याने मी अक्षय कुमार याच्याकडे गेले होते. त्यावेळी मला थेट अक्षय कुमार म्हणाला की, लग्नानंतर बाॅलिवूडमध्ये काम मिळणे थोडेसे अवघडच आहे.

पुढे शांति प्रिया म्हणाली, इतकेच नाही तर आता तुला अभिनेत्रीचा रोल देखील मिळू शकत नाही असेही मला अक्षय कुमार हा म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून मला सुरूवातीला धक्काच बसला. त्यानंतर मी बाॅलिवूड चित्रपटामध्ये काम मिळण्यासाठी अक्षय कुमार याला खूप जास्त मेसेज केले. मात्र, त्याने माझ्या मेसेजकडे दुर्लक्ष केले.
माझ्यासोबत घडलेला हा सर्व प्रकार मी माझ्या आईला सांगितला. माझ्या आईला देखील दु:ख झाले. मुलीने तर मला परत अक्षय कुमार याच्यासोबत संपर्क साधण्यास मनाई केली. मुळात म्हणजे ज्यावेळी मी अक्षय कुमार याच्यासोबत सौगंध चित्रपटात काम केले त्यावेळी तो नवखा अभिनेता होता तरीही मी त्याच्यासोबत काम करण्यास होकार दिला. आता त्याची बारी होती मदत करण्याची मात्र, त्याने ते केले नाही.
