अंडरवर्ल्ड डॉनने देश सोडताच अभिनेत्री अंडरग्राउंड, आज बौद्ध भिक्षूसोबत जगतेय आयुष्य
Love Life: अंडरवर्ल्ड डॉनसोबत अभिनेत्रीचं खास कनेक्शन, त्याने देश सोडताच अभिनेत्रीच्या अडचणीत मोठी वाढ, झाली अंडरग्राउंड, अध्यात्मिक मार्गावर गेलेली अभिनेत्री आज बौद्ध भिक्षूसोबत जगतेय आयुष्य

Love Life: अभिनेत्रीचं खासगी आयुष्य कायम चर्चेत असतं. अनेक वर्ष बॉलिवूड गाजवल्यानंतर काही अभिनेत्री अचानक झगमगत्या विश्वातून गायब झाल्या. अभिनेत्री आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसल्या तरी खासगी आयुश्यामुळे कायम चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये करीयर करत असताना अभिनेत्रीच्या नावाची चर्चा अनेक अभिनेत्यांसोबत होते. एका अभिनेत्रीच्या रिलेशनशिपच्या चर्चा अंडरवर्ल्ड डॉनसोबत रंगल्या होत्या. वादग्रस्त प्रकरणात अडकल्यानंतर डॉनने देश सोडला आणि अभिनेत्री अंडरग्राउंड झाली. आता ती अभिनेत्री बौद्ध भिक्षूसोबत आयुष्य जगतेय.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री मंदाकिनी आहे. ‘राम तेरी गंगा मैली’ सिनेमात इंटिमेट सीन दिल्यानंतर सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगली होती. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेते राज कपूर यांना टीकेचा सामना करावा लगला पण मंदाकिनी हिच्या पुढे सिनेमांची रांग लागली होती.
‘बॉलिवूडची सेक्स सायरन’ म्हणून देखील अभिनेत्रीची ओळख झाली होती. प्रसिद्धी झोतात आल्यानंतर मंदाकिनी हिने जीतेंद्र, मिथुन चक्रवर्ती आणि आदित्य पंचोली यांसारख्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली. पण अचनाक अभिनेत्री गायब झाली आणि तिचं नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यासोबत जोडलं जाऊ लागलं.
तेव्हा बॉलिवूडवर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची दहशत होती. अनेक बॉलिवूड पार्टीमध्ये देखील दाऊत उपस्थित असायचा. दाऊद इब्राहिम आणि मंदाकिनी यांचा एक फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ज्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली.
पण अभिनेत्रीने दाऊद इब्राहिमसोबत असलेल्या नात्याचा कधीच स्वीकार केला नाही. ‘आम्ही चांगले मित्र होतो…’ अशी कबुली अभिनेत्रीने दिली. पण 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर दाऊद देश सोडून गेला आणि मंदाकिनीच्या अडचणी मर्यादेपलीकडे वाढल्या. त्यावेळी मंदाकिनी बंगळुरूमधील एका फार्महाऊसमध्ये अंडरग्राउंड झाली. पण चौकशीनंतर अभिनेत्रीला क्लीन चिट देण्यात आली.
अखेर मंदाकिनी हिने झगमगत्या विश्वाचा निरोप घेतला आणि अभिनेत्रीने अध्यात्मिक मार्गाचा स्वीकार केला. तेव्हा मंदाकिनी हिची ओळख बौद्ध भिक्षू Kagyur T Rinpoche Thakur यांच्याशी झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर दोघांनी मुंबईत एक तिबेटियन योग केंद्र सुरू केलं. त्यांना एक मुलगा रब्बील आणि मुलगी रब्जे इनाया ठाकूर आहे.
