नवऱ्यानं हुंड्यापायी जाळलं मला…, वैष्णवी हगवणे प्रकरणावर उत्कर्ष शिंदेचं अंगावर काटा आणणारं गाणं
Vaishnavi Hagavane Death: दीर, नणंद, सासूने छळलं, नवऱ्याने जाळलं..., वैष्णवी हगवणेच्या मृत्यूमुळे सर्वत्र संतापाचं वातावरण, उत्कर्ष शिंदेचं अंगावर काटा आणणारं गाणं, सोशल मीडियावर गाणं तुफान चर्चेत

Vaishnavi Hagavane Death: कॉलेजमध्ये झालेली मैत्री, मैत्रीचं प्रेमात झालेलं रुपांतर, वडिलांचा नकार असताना देखील वैष्णवीने शशांकसोबत लग्नासाठी धरलेला हट्ट, लग्नात 51 तोळे सोनं, आलिशान गाडी आणि बरंच काही… मुलीचा संसार वाचण्यासाठी वैष्णवीच्या आई – वडिलांना सर्व प्रयत्न केलं. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. सासरच्या मंडळीच्या मागण्या दिवसागणिक मोठ्या होत होत्या… मागण्या पूर्ण झाल्या नाही तर, वैष्णवीचा होणारा छळ… तिला होणारी मारहाण… यामध्ये अखेर वैष्णवी 9 महिन्यांच्या बाळाला सोडून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. पण ही हत्या आहे की आत्महत्या? हे सांगणं कठीणच… असं संपूर्ण महाराष्ट्र म्हणत आहे.
वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबियांना अटक केली आहे. सध्या वैष्णवी हगवणे कुटुंब वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. हगवणे कुटुंबियांनी कठोर शिक्षा झालीच पाहिजे… असं संपूर्ण महाराष्ट्र म्हणत आहे. हुंड्यापायी लेकीचा जीव गेल्यामुळे आई – वडील पूर्णपणे कोलमडले आहे.
View this post on Instagram
दरम्यान अनेक सेलिब्रिटींनी देखील वैष्णवी हगवणे प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. आता अभिनेता-गायक आणि ‘बिग बॉस मराठी’ फेम डॉ. उत्कर्ष शिंदे याने संताप व्यक्त केला. उत्कर्ष शिंदे याने सोशल मीडियावर गाणं म्हणत संताप व्यक्त केलं. ‘हुंडाबळी’वर गाणं आधारित आहे.
सांगायचं झालं तर, उत्कर्षने काही वर्षांपूर्वी ‘बिग बॉस मराठी 3’मध्ये त्याचे हे गाणे सादर केले होते. ‘दीराने ओढलं मला, नणंदेनं पाडलं मला, सासूने झोडलं मला, कुणी ना सोडलं मला… शेवटी नवऱ्यानं हुंड्यापायी जाळलं मला…’ असे गाण्याचे बोल आहेत.
व्हिडीओ पोस्ट करत उत्कर्ष म्हणाला, ‘हुंडाबळी हे माझ गाणं आज विजया आनंद म्युझिक यूट्यूब चॅनलला रिलीज होताच सर्वत्र वायरल होताना दिसतय. समाजात घडणाऱ्या घटनेवर त्या भल्या मोठ्या बिगबॉसच्या मंचावर ही बोललो होतो आज ही बोलतो आणि उद्या ही असच समाजातल्या गोष्टींना पुढेप्रेक्षकान समोर घेऊन येणारच.’ सध्या उत्कर्षची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणाबद्दल सांगायचं झालं तर, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात 5 जणांना अटक झाली आहे. वैष्णवीचा पती, सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. या सर्वांची पोलीस कोठडी 28 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे.
