AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tunisha Case: तुनिशाचा Unseen Video सोशल मीडियावर व्हायरल; ‘मिस्ट्री मॅन’सोबतच्या नात्यावरून प्रश्न उपस्थित

शिझानवरील आरोपांदरम्यान तुनिशाचा 'मिस्ट्री मॅन'सोबतचा व्हिडीओ व्हायरल; नेटकऱ्यांनी उपस्थित केले प्रश्न

Tunisha Case: तुनिशाचा Unseen Video सोशल मीडियावर व्हायरल; 'मिस्ट्री मॅन'सोबतच्या नात्यावरून प्रश्न उपस्थित
Tunisha Case: तुनिशाचा Unseen Video सोशल मीडियावर व्हायरलImage Credit source: Youtube
| Updated on: Jan 04, 2023 | 10:16 AM
Share

मुंबई: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. तुनिशाने 24 डिसेंबर रोजी ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी तुनिशाच्या आईने अभिनेता शिझान खानवर आरोप केले. तुनिशाच्या आईच्या तक्रारीनंतर शिझानला पोलिसांनी अटक केली. या अटकेनंतरही दोन्ही कुटुंबीयांकडून पत्रकार परिषद घेत आरोप-प्रत्यारोप झाले. यादरम्यान आता तुनिशाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये तुनिशा तिचा मित्रा गौरव भगतसोबत पहायला मिळतेय. या व्हिडीओमध्ये दिसतंय की तुनिशाला एअरपोर्टवर सोडण्यासाठी गौरव येतो. आपल्या खास मैत्रिणीला निरोप देताना गौरव भावूक होतो. दोघं एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि गौरव तुनिशाला सावरण्याचा प्रयत्न करतो. या व्हिडीओवरून नेटकरी तुनिशावर प्रश्न उपस्थित करू लागले आहेत.

‘जर तुनिशा गौरवसोबत असती तर आज हा दिवस आला नसला. दोघं एकमेकांसोबत खुश होते’, असं एकाने लिहिलं. तर ‘हा व्लॉग पाहून असं दिसतंय की गौरव तुनिशावर खूप प्रेम करायचा. मात्र तिने शिझानच्या मागे लागून आत्महत्या केली’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘जर तुनिशा याच्याशी ब्रेकअप झाल्यानंतर खचली नाही. तर सहा महिने शिझानसोबत राहून ती कशी काय खचू शकते’, असा सवालही नेटकऱ्यांनी केला.

तुनिशा आणि गौरवचा व्हिडीओ-

तुनिशाच्या आत्महत्येनंतर तिचा मित्र गौरव पूर्णपणे खचला होता. अभिनेत्रीच्या आठवणीत त्याने एक व्हिडीओसुद्धा शेअर केला होता. ज्यामध्ये तो तुनिशासोबत पहायला मिळाला. ‘ही रिल नेहमीच मला स्वत:ला एडिट करायची होती. आज मी ते काम पूर्ण केलं. मात्र मला तुझी खूप आठवण येतेय’, असं त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना