विद्या बालन इंटीमेट सीनला घाबरली; शूटनंतर मध्यरात्री संजय तिच्या रुममध्ये गेला, कपाळावर किस केलं अन्…
बॉलीवूड चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन्स आता अगदीच सामान्य झाले आहेत. पण एक अभिनेत्री जिला तिच्या एका इंटीमेट सीनबद्दल फार दबाव वाटत होता. ती अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. हा सीन तिचा संजय दत्तसोबत होणार होता. शूटवेळी आणि नंतर तिला संजय दत्तचा जो अनुभव आला तो तिने शेअर केला आहे.

बॉलीवूड चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन्स आता अगदीच सामान्य झाले आहेत. आताच्या कलाकारांना त्याबाबत फार सहजता आली आहे. पण काही कलाकारांना आजही असे सीन करताना अवघडल्यासारखं होतं किंवा सहजता येत नाही. अशीच एक अभिनेत्री जिला तिच्या एका इंटीमेट सीनबद्दल फार दबाव वाटत होता. ती खूप घाबरली होती, ती अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. मुख्य म्हणजे विद्या बालनचा हा सीन संजय दत्तसोबत होता त्यामुळे ती अजूनच घाबरली होती. पण त्यावेळी तिला संजय दत्तचा आलेला अनुभव देखील शेअर केला.
संजय-विद्याचा पहिला इंटिमेट सीन
संजय दत्तची गणना केवळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टारमध्येच होत नाही तर त्यांनी पडद्यावर अनेक उत्तम रोमँटिक सीन्सही केले आहेत. दोन दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या विद्या बालनबद्दल बोलायचे झाले तर, जेव्हा विद्याने पहिल्यांदा पडद्यावर इंटिमेट सीन केला तेव्हा तिचा स्क्रीन पार्टनर संजय दत्त होता.
टिमेट सीन करताना विद्या का घाबरली होती?
जेव्हा पहिल्यांदा असा सीन शूट करायचा होता, तेव्हा संजय दत्तला समोर पाहून विद्या बालन खूप घाबरली होती. मात्र, नंतर संजय दत्तने परिस्थिती समजून घेतली आणि विद्याला आरामदायी वाटलं, त्यानंतरच हे सीन शूट करता आले.
‘परिणिता’मध्ये दिसली होती संजय-विद्याची जोडी
ही संपूर्ण कहाणी परिणीता चित्रपटाची आहे, या चित्रपटात विद्या बालनची भूमिका सैफ अली खानच्या विरुद्ध होती. या चित्रपटात संजय दत्त देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत होता आणि संजय-विद्या यांना चित्रपटात एक इंटिमेट सीन द्यावा लागला होता. एका मुलाखतीत संभाषणादरम्यान विद्याने ही संपूर्ण कहाणी सांगितली. याबद्दल विद्या म्हणाली की ,”आम्ही या चित्रपटासाठी एक इंटिमेट सीन शूट करत होतो. मग सकाळी संजय माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘मी खूप घाबरलो आहे. आपण हा सीन कसा करू शकतो. मला आश्चर्य वाटत होते की हा संजय दत्त आहे, इतका अनुभवी अभिनेता असूनही, तो असं कसं बोलत आहे.’
View this post on Instagram
मध्यरात्री संजय विद्याच्या खोलीत का गेला ?
विद्या पुढे म्हणाली, ‘खरं तर संजयने हे सर्व मला आरामदायी वाटावे म्हणून सांगितले. असे बोलून त्याने माझ्यावरील ओझे हलके केले. हा माझा पहिलाच इंटिमेट सीन होता आणि मी खूप घाबरले होते. आमचं शूट झालं.तो इंटीमेट सीनही आम्ही दिला. आणि त्यानंतर त्याच रात्री तो माझ्या रुममध्ये आला आणि दाराबाहेरच उभा राहिला आणि त्याने मला विचारले की मी ठीक आहे का, त्यानंतर माझ्या कपाळावर कीस करून तो निघून गेला. म्हणूनच आज संजय दत्त…हा संजय दत्त आहे.’ असं म्हणत विद्याने संजय दत्तचं कौतुक केलं.
