AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kushi Movie | विजय देवरकोंडा याने कुशी चित्रपटासाठी घेतली तब्बल इतके कोटी फिस, मोठा खुलासा

विजय देवरकोंडा हा त्याच्या कुशी या चित्रपटामुळे सध्या जोरदार चर्चेत आहे. नुकताच विजय देवरकोंडा याचा कुशी हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे कुशी हा चित्रपट मोठा धमाका करताना देखील दिसत आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा याच्यासोबत सामंथा रुथ प्रभु मुख्य भूमिकेत आहे.

Kushi Movie | विजय देवरकोंडा याने कुशी चित्रपटासाठी घेतली तब्बल इतके कोटी फिस, मोठा खुलासा
| Updated on: Sep 03, 2023 | 8:36 PM
Share

मुंबई : विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) यांचा नुकताच कुशी हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभु हे दिसले. विशेष म्हणजे विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि सामंथा रुथ प्रभु यांचा कुशी हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. कुशी हा चित्रपट 1 सप्टेंबरला रिलीज झालाय. या चित्रपटाने तूफान अशी कमाई करण्यासही सुरूवात केलीये. विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभु यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. चित्रपटाने धमाका करण्यास सुरूवात केली.

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा काही दिवसांपूर्वीच लाईगर हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचेही जोरदार प्रमोशन करताना विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे हे दिसले. अनन्या पांडे हिने लाईगर चित्रपटाच्या माध्यमातून साऊथमध्ये डेब्यू केला. लाईगर चित्रपटाला साऊथमध्ये मोठे प्रेम मिळताना देखील दिसले. लाईगर चित्रपटासाठी विजय देवरकोंडा याच्या अभिनयाचे काैतुक केले गेले.

विजय देवरकोंडा याचा कुशी हा चित्रपट देखील मोठी धमाल करतोय. विशेष म्हणजे कुशी चित्रपटासाठी विजय देवरकोंडा याने तब्बल 23 कोटी रुपये रूपये फिस घेतल्याचे सांगितले जात आहे. विजय देवरकोंडा हा साऊथचा तगडी फिस घेणारा अभिनेता आहे. विजय देवरकोंडा याचे चित्रपट नेहमीच धमाका करताना बाॅक्स आॅफिसवर दिसतात.

सामंथा रुथ प्रभु हिने देखील कुशी चित्रपटाची मोठी फिस घेतलीये. करण जोहर याच्या शोमध्ये याबद्दल काही दिवसांपूर्वीच खुलासा करताना सामंथा रुथ प्रभु ही दिसली होती. असे सांगितले जाते की, सामंथा रुथ प्रभु हिने कुशी चित्रपटासाठी 4.5 कोटी रूपये फिस घेतली आहे. चाहत्यांना विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभु यांची जोडी आवडली आहे.

सामंथा रुथ प्रभु आणि विजय देवरकोंडा यांच्या फिसमधील फरकामुळे कुशी चित्रपट चर्चेत होता. आता चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. चित्रपट बाॅक्स आॅफिसवर अनेक रेकाॅर्ड हा नक्कीच तोडून शकतो. निर्मात्यांना देखील या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत. पुढील काही दिवस बाॅक्स आॅफिसवर कुशी चित्रपटाची हवा बघायला मिळेल.

सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.
नागपुरात शिक्षकांचं विविध मागण्यासाठी आंदोलन
नागपुरात शिक्षकांचं विविध मागण्यासाठी आंदोलन.