Tamannaah Bhatia | तमन्ना भाटियाबद्दलचा ‘तो’ प्रश्न ऐकून विजयचा चढला पारा; पापाराझींना म्हणाला..

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा हे गेल्या महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी प्रेमाची जाहीर कबुलीसुद्धा दिली आहे. नुकतेच हे दोघं मालदिवला फिरायला गेले होते. मुंबईत परतल्यानंतर विजयचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Tamannaah Bhatia | तमन्ना भाटियाबद्दलचा 'तो' प्रश्न ऐकून विजयचा चढला पारा; पापाराझींना म्हणाला..
Tamannaah Bhatia and Vijay VarmaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 01, 2023 | 8:13 AM

मुंबई | 1 सप्टेंबर 2023 : गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात जेव्हा अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांचा किसिंग फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हापासून त्यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली. काही महिन्यांपूर्वीच दोघांनी माध्यमांसमोर जाहीरपणे एकमेकांबद्दलचं प्रेम कबुल केलं. विजय आणि तमन्ना आता खुलेपणाने डेट करताना दिसतात. नुकतेच हे दोघं मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले होते. तिथून परतल्यावर जेव्हा विजयला पापाराझींनी तमन्नाबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा तो त्यांच्यावर चांगलाच भडकला. पापाराझींनी केलेली मस्करी विजयला अजिबात आवडली नाही. त्याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पापाराझीचा प्रश्न ऐकून विजयचा चढला पारा

विजय आणि तमन्नाने ‘लस्ट स्टोरीज 2’ या नेटफ्लिक्सवरील अँथोलॉजी चित्रपटात एकत्र काम केलं. याच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली. सुरुवातीला दोघांनीही त्याबद्दल मौन बाळगणं पसंत केलं. मात्र नंतर दोघांनीही विविध मुलाखतींमध्ये एकमेकांबद्दलचं प्रेम जाहीरपणे व्यक्त केलं. नुकतेच हे दोघं मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेऊन मुंबईला परतले. तेव्हा पापाराझींनी विचारलेले प्रश्न ऐकून विजयचा पारा चढला. त्याने त्याच्याच अंदाजात पापाराझींना सुनावलं.

हे सुद्धा वाचा

तमन्नाबद्दलच्या प्रश्नावर भडकला विजय

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये विजय जेव्हा एअरपोर्टमधून बाहेर येत असतो, तेव्हा पापाराझींना पाहून हसतो. पापाराझीसुद्धा त्याचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक करत असतात. इतक्यात एक पापाराझी विजयला विचारतो, “मालदीवच्या समुद्रात मजा करू आलास?” हे ऐकून विजयच्या चेहऱ्यावरील राग स्पष्ट दिसून येतो. तो संबंधित पापाराझीला म्हणतो, “अशा पद्धतीने तुम्ही बोलू शकत नाही.”

पहा व्हिडीओ

जीक्यू इंडियाला दिलेल्या मुलाखतीत विजय वर्मा म्हणाला होता, “आम्ही दोघं एकमेकांना डेट करतोय. दोघं एकमेकांसोबत खूप खुश आहोत. मी तिच्या प्रेमात अक्षरश: वेडा आहे. माझ्या आयुष्यातील ‘विलेन’चा टप्पा आता संपलेला आहे, आता मी रोमान्सच्या टप्प्यात आहे.” याआधी ‘फिल्म कम्पॅनियन’ला दिलेल्या मुलाखतीत तमन्ना विजयबद्दल म्हणाली होती, “मला वाटत नाही की तुम्ही एखाद्याकडे यासाठी आकर्षित होऊ शकता कारण तो तुमचा सहकलाकार आहे. माझे अनेक सहकलाकार होते. माझ्या मते एखाद्याच्या प्रेमात पडणं किंवा एखाद्यासाठी मनात काही भावना येणं ही नक्कीच अत्यंत वैयक्तीत बाब आहे. ते काय काम करतात, याच्याशी त्याचं काहीच घेणं-देणं नाही. एखाद्याची नोकरी किंवा व्यवसाय पाहून प्रेम केलं जात नाही.”

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.