विरुष्काच्या घरी नन्ही परीचं आगमन, सोशल मीडियावर तैमूरच्या स्टारडमवर टीका, मिम्सची लाट!

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या दोघांना कन्यारत्न प्राप्त झालंय.

विरुष्काच्या घरी नन्ही परीचं आगमन, सोशल मीडियावर तैमूरच्या स्टारडमवर टीका, मिम्सची लाट!

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या दोघांना कन्यारत्न प्राप्त झालंय. विरुष्काच्या घरी नन्ही ‘परी’चे आगमन झालंय. ट्विट करुन विराटने आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. जिथे ट्विटर विराट कोहली आणि अनुष्काच्या बातम्यांना ट्रेंडिंग करत आहे सोबतच तैमूर देखील आता ट्रेंड होत आहे. विराटला मुलगी झाल्यापासून तैमूरला ट्विटरवर ट्रोल केले जात आहे. तैमूरवर करण्यात येत असलेले मिम्स पाहुण तुम्ही पोट धरून हसाल. (Virat became A Father, mimes on Taimur on social media)

अनुष्काला मुलगीच होणार अशी भविष्यवाणी बंगळुरुच्या एका ज्योतिषीने केली होती. “विराट आणि अनुष्‍का पालक होण्याच्या अत्यंत रंजक प्रवासावर निघाले आहेत. त्यांचं पहिलं बाळ हे मुलगी असेल. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना पावर कपलमध्ये गणलं जातं. ज्योतिषशास्त्रीय कॅलक्युलेशन आणि फेस रिडिंगच्या आधारे विराट कोहलीला पहिली मुलगी होणार आहे”, असा दावा या ज्योतिषीने केला होता.

काही दिवसांपूर्वी व्होग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत अनुष्का शर्मा हिने आपल्या मुलीला काही दिवस प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवणार असल्याचे सांगितले होते. विराट आणि मी खूप विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे. आम्हाला आमच्या बाळाला सोशल मीडियाच्या जंजाळात गुंतवायचे नाही. त्यामुळे आम्ही बाळाला प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे अवघड असले तरी आम्ही या निर्णयाचे पालन करण्याचा प्रयत्न करु, असे अनुष्काने म्हटले होते.

संबंधित बातम्या : 

Virat Anushka Daughter: विरुष्काच्या बाळाचा पहिला फोटो पाहिलात का?

Virat Anushka Daughter | विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या घरी ‘लक्ष्मी’चे आगमन

(Virat became A Father, mimes on Taimur on social media)

Published On - 3:55 pm, Tue, 12 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI